सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, बचाव पथक दाखलं, नद्यांच्या पाण्यात वाढ होत असल्यामुळे…
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत चांगलीचं वाढ झाली आहे.
सांगली : मान्सून सुरु झाल्यापासून सांगली (Sangli rain) जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. परंतु मागच्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी चांगलीचं वाढली आहे. वारणा नदी (warna river) पात्राबाहेर पडली आहे, तर कृष्णेच्या पाणी पातळीत सुध्दा वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे बचाव पथक सांगली शहरात दाखल झालं आहे. शिराळा तालुक्यात मागच्या दोन दिवसात अतिवृष्टी (heavy rain sangli kolhapur) झाली आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने गरज असल्यास घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे.
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत ६७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत सुध्दा चांगलीचं वाढ झाली आहे. विशेष म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे बचाव पथक सांगलीत दाखल झालं आहे.
शिराळा तालुक्यात चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे चांदोली धरण पन्नास टक्के भरले आहे. मागच्या महिन्यात धरण तळ गाठेल अशी स्थिती होती. चांदोली अभयारण्य भागात मुसळधार पाऊस असतो. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीचं वाढ झाली. त्याचबरोबर वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुध्दा मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे त्या दोन जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाण्याच्या पातळी सुध्दा कमालीची वाढ झाली आहे. रत्नागिरीत अनेक नद्यांना पूर आला आहे.