Ramdas Athavale VIDEO | कशासाठी काढताय तुम्ही भोंगे, काय करताय अशी सोंगे.. सांगलीत रामदास आठवलेंनी दोन्ही ठाकरेंचे कान टोचले!
एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. मी मुख्यमंत्री यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण काही जमत नाही. पण ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुखनी नांदा पण होऊ देऊ नका वांदा, असा सल्ला रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
सांगलीः कशासाठी काढताय तुम्ही भोंगे.. का करताय तुम्ही अशी सोंगे? अशा आशयाची शेरेबाजीकरून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) सांगलीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनावर टीका केली. एक दोन वेळी त्यांचा अजान असो आणि आपण समजून घेत नाहीत. आपले गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांना ते विरोध करत नाहीत, मग आपण अशी दादागिरी करणं योग्य नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं. सांगली येथे आरपीआयच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. शीर्ष कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवले यांनी विविध विषयांवर चारोळ्या करून उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन केलं तसंच कवितांच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या राजकारणावर टीकाही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही यावेळी त्यांना कान टोचले.
‘दादागिरी योग्य नाही’
रामदास आठवले सांगलीत बोलताना म्हणाले, ‘ मी अनेक वेळा सांगतो मुस्लिम समाज हा हिंदूच होता. अडीच हजार वर्षांपूर्वी या देशात सर्माट अशोकापूर्वी सर्व देश बौद्ध होता. सगळेच बौद्ध होते. शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली. नंतर सगळा देश हिंदू झाला. मोगल या ठिकाणी आले आणि आपले हिंदू समाजाचे लोकच मुस्लिम झाले. इंग्रज याठिकाणी आले त्यावेळेला हिंदू समजाचे लोक ख्रिश्चन झाले. विनाकारण आपण असा वाद लावण्याचा आवश्यकता नाही. त्यांचा भोंगा आवडत नसेल तर आम्ही आमची भीमजयंती साजरी करतो. रात्री दहा वाजता माइक बंद होतो.आपण नवरात्र, गणेशोत्सव साजरा करतो, त्यावेळेला त्यांना त्रास होत नाही का? तुम्हाला अजान ऐकायचं नसेल तर ऐकू नका. पण अशी दादगिरीची भूमिका योग्य नाही.’
आटपाडीकरांनाही खुश केले
आटपाडी येथे झालेल्या या मेळाव्यात रामदास आठवले यांनी स्थानिकांनाही चांगलेच खुश केले. यावेळी त्यांनी एक शीघ्र चारोळी केली. ती अशी-
मी आलो आहे आटपाटीच्या घरात कारण जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र खरात आता विट्याला जाणार आहे आमची वरात म्हणूनच आरपीआय आले आहे भरात
माझ्या भीमाचं योगदान आहे माझ्या लालबत्तीच्या गाडीला म्हणूनच मी आलेलो आहे आटपाडीला जर कुणी लावला माझ्या गाडीला आग लावून टाकेल मी त्याच्या माडीला..
‘मुख्यमंत्रीसाहेब सुखानी नांदा, होऊ देऊ नका वांदा’
मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका करताना रामदास आठवले म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी भीम शक्ती आणि शिव शक्ती अशी भूमिका मांडली. मी काँग्रेस पक्षात होतो. पवार साहेबांच्या सोबत होतो. पण मला हरवले आणि मी ठरवले आणि भीम शक्ती आणि शिव शक्ती झाली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आणि सत्ता आली. मी काँग्रेस मध्ये होते तेव्हा त्यांना सत्ता मिळाली. मी त्यांना सोडल्यावर त्यांना सत्तेतून बाहेर केले. पण शिवसेनेने पाप केले आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. आता मुख्यमंत्री पद मिळाले. पण मुख्यमंत्री मिळाले असले तरी एका चक्रव्यूहात आहेत. एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. मी मुख्यमंत्री यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण काही जमत नाही. पण ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुखनी नांदा पण होऊ देऊ नका वांदा, असा सल्ला रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.