Sangli Sadabhau Khot : बारामतीचा गडी हुशार, ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला; सदाभाऊ खोत यांचा सांगलीत शरद पवारांना टोला
बारामतीचा गडी कसा आला, हे आपण गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत. मला वाटते की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.
सांगली : बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत. हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असा खोचक टोला सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी लगावला आहे. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभप्रसंगी बोलत होते. नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असे ब्राह्मण समाजाला सांगितले. मात्र आम्ही असे म्हटलेच नाही. हे ब्राह्मण समाज (Brahman) आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत. मला वाटते की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
‘फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे’
ते पुढे म्हणाले, की मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरे करायचे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे. हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असे फडणवीस यांनी म्हटले होते, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचे समर्थन केले आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊच्या नादाला कश्याला लागताय? तुम्हाला चौकात उघडे केल्याशिवाय राहणार नाही, असेही खोत म्हणाले. हे राज्य जनतेसाठी नाही. हे राज्य जनतेला लुटण्यासाठी चालवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
शरद पवारांवर टीका करताना काय म्हणाले सदाभाऊ खोत?
Sangli Sadabhau Khot : बारामतीचा गडी हुशार, ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला; सदाभाऊ खोत यांचा सांगलीत शरद पवारांना टोला काय म्हणाले? पाहा व्हिडिओ – #sharadpawar #sadabhaukhot #sangli #politics अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/8znwuyoC5I
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2022
‘या मुख्यमंत्र्यांना काही कळत नाही’
हे सरकार आंधळे, बहिरे, लुळे आहे. या सरकारला सामान्य माणसाचे काही देणेघेणे नाही. इतर राज्यात पेट्रोल स्वस्त आहे. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन रुपयांनी स्वस्त केले. म्हणजे सव्वा लाखाची मूठ याची दोन रुपयाची झाली. दोन रुपयाचे पानपट्टीवर पानही मिळत नाही. महाराष्ट्रमधील जनतेची थट्टा तुम्ही करत आहात, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केली.
‘पागल माणसे क्रांती करतात’
गोपीचंद पडळकर यांच्याविषयी ते म्हणाले, की काय काय गडी म्हणत्यात गोपीचंदच्या माघं कसा लागलास. म्हटलं मी पहिलं पागल होतो आणि दुसरं पागल मिळालं आणि आमचं जमलं. पागलाची दोस्ती होती आणि क्रांती कोण करतं. शहाणी माणसं क्रांती करत नाहीत. पागल माणस क्रांती करतात. कारण आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.