करोडो रुपयांचा नरक्या वनस्पती जळून खाक, अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद, वन विभागाच्या कार्यालयासमोर…
चांदोली अभयरण्यात विविध प्रकारची झाडं आहेत. त्याचबरोबर प्राणी सुद्धा अधिक आहेत. त्यामुळे अभयरण्याच्या शेजारी असणाऱ्या गावांमध्ये अनेक प्राणी पाहायला मिळत आहेत.
सांगली : शिराळा (Sangli shirala) तालुक्यातील चांदोली अभयरण्यात (chandoli sanctuary) काल घडलेल्या घटनेमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. कालच्या प्रकरणात मुख्य आरोपी कोण अशी सगळीकडं चर्चा सुरु झाली आहे. मागच्या कित्येक वर्षापासून नरक्या वनस्पतीची तस्करी होत असल्याची ओरड सुरु आहे. या आगोदर सुध्दा अनेक नरक्या तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नरक्याची (smuggling drugs plants) अनेक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत अशी गावाकऱ्यांमध्ये चर्चा आहे. काल तीन वाहन जळाल्यामुळे करोडो रुपयांचा नरक्या जळून खाक झाला आहे. त्यामुळे या मागचा मुख्यसुत्रधार कोण अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची सुध्दा संपूर्ण शिराळा तालुक्यात चर्चा आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली येथे जप्त करण्यात आलेल्या नरक्या आणि तीन वाहन जळून झाल्याची घटना घडली आहे. वन विभागाच्या कार्यालयात शेजारी सर्व मुद्देमाल जप्त करून ठेवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याचे प्रकार घडला आहे. यामध्ये करोडो रुपयांचा नरक्या वनस्पती जळून खाक झाला आहे. तसेच या ठिकाणी असणारी तीनं वाहनं देखील जळून खाक झाली आहेत. ही आग नेमके कशी लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही,वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टोक्ती देण्यात आली नाही.
काल दुपारी वनविभागाच्या आवारात असलेल्या तीन वाहनांना आग लागली, आग इतकी भयानक होती, काही मिनिटामध्ये तीन ट्रक आणि नरक्या वनविभागाच्या कार्यालयासमोर जळून खाक झाला. ही आग नेमकी कुणी लावली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी अनेकांची मागणी आहे. नरक्या वनस्पती या आगोदर सुध्दा अनेकदा चोरुन नेताना गाड्या सापडल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांना या प्रकरणात शिक्षा सुद्धा झाली आहे. नरक्या वनस्पतीचा औषध तयार करण्यासाठी उपयोग होतो.
चांदोली अभयरण्यात विविध प्रकारची झाडं आहेत. त्याचबरोबर प्राणी सुद्धा अधिक आहेत. त्यामुळे अभयरण्याच्या शेजारी असणाऱ्या गावांमध्ये अनेक प्राणी पाहायला मिळत आहेत. प्राण्यांनी आतापर्यंत शेतीचं मोठं नुकसान सुद्धा केलं आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक शेतकऱ्यांना दर्शन दिलं आहे.