Shirala : पूल पाण्यात कोसळला, लाटा उसळल्या, कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला घराकडं पळाल्या, कारण…

पूल कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे नव्या पूलाची मागणी केली आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी तिथं दोन महिला कपडे धूत होत्या. पूल कोसळल्यानंतर कॅनॉलमधील पाण्याच्या लाटा उसळल्या, त्यावेळी घाबरलेल्या महिला घराकडं पळाल्या.

Shirala : पूल पाण्यात कोसळला, लाटा उसळल्या, कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला घराकडं पळाल्या, कारण...
shirala kusalewadiImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 10:10 AM

शंकर देवकुळे, सांगली : जिल्ह्यातील शिराळा (Sangli Shirala) तालुक्यातील कुसळेवाडीतील (kusalewadi) वारणा डावा कालव्यावरील अचानक ढासळला. ती घटना घडली त्यावेळी पुलावर कोणी नसल्यामुळे कसल्याची प्रकारची जीवीतहाणी झाली नाही. हा पूल ज्यावेळी कोसळला, त्यावेळी तिथं कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला एकदम भयभीत झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पूर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची (farmer) मोठी अडचण होणार आहे. त्या रस्त्यावरून शेतीच्या अनेक वस्तू नेल्या जात होत्या. त्याचबरोबर कुसळेवाडी मस्कर गल्लीचा संपर्क तुटला आहे. अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुध्दा कसल्याची प्रकारची दुरुस्ती केली नसल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत.

गावची नव्वद टक्के शेती पुलाच्या पलीकडे…

शिराळा पश्चिम भागात कुसळेवाडी हे साधारण एक हजार लोक संख्येचे गाव आहे. गावाला लागून वारणा डावा कालवा गेला आहे. गावची नव्वद टक्के शेती पुलाच्या पलीकडे असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कालव्यावरील पुलावरून सतत शेतकऱ्यांची रहदारी सुरू होती. पुलाच्या पलिकडे दहा कुटुंब वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झाली होती. पुलावर लावण्यात आलेले पोल सुध्दा गायब झाले आहेत. पुलाच्या मधील दगडी भिंतीची दगडे हळूहळू ठासळू लागली होती. तर एका बाजूने पुलाचा भराव ही ठासळू लागला होता.

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुल कोसळला

याबाबत कुसळेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाला वेळोवेळी पुलासंदर्भात कागदोपत्री निवेदन दिले होते. वारंवार अधिकाऱ्यांना विनवणी करुन सुध्दा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुल कोसळला असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी शेतकऱ्यांची अथवा कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नाही. पुल कोसळल्याने येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पणुंब्रे वारूण गावच्या पूलावरून वाहतूक करावी लागणार आहे. तसेच कॅनोलला कायम पाणी राहिल्यास नागरिकांची मोठी अडचण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी घाबरलेल्या महिला घराकडं पळाल्या.

पूल कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे नव्या पूलाची मागणी केली आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी तिथं दोन महिला कपडे धूत होत्या. पूल कोसळल्यानंतर कॅनॉलमधील पाण्याच्या लाटा उसळल्या, त्यावेळी घाबरलेल्या महिला घराकडं पळाल्या.  त्यांनी गावातल्या लोकांना या घटनेची माहिती दिली.  घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली,

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.