लहानपणी वडिलांचं छत्र हरपलं, आईनं शिकवलं, लग्नानंतर दोन मुलं झाली, जिद्द पुर्ण करण्यासाठी तो धावला…

एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अनेकजण शेवटपर्यंत जिद्दीने प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळतचं असं नाही. पण एका तरुणाला यश मिळाल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने संपूर्ण स्टोरी सांगायला सुरुवात केली.

लहानपणी वडिलांचं छत्र हरपलं, आईनं शिकवलं, लग्नानंतर दोन मुलं झाली, जिद्द पुर्ण करण्यासाठी तो धावला...
malewadiImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 9:05 PM

शिराळा : ग्रामीण भागात पोलिस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्य़ा तरुणांची संख्या अधिक आहे. प्रत्येकवर्षी स्वप्न साकार करणाऱ्या तरुणांचं सुध्दा प्रमाण अधिक आहे. नुकताच महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) भरतीचा निकाल जाहीर झाला आणि तरुणांच्या आनंदात भर पडली. राज्यातील अनेक तरुण या भरती यशस्वी ठरले. सांगली (sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील माळेवाडी (shirala malewadi) या गावातील तरुणाने अत्यंत गरीबीच्या परिस्थितून यश मिळवलं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात त्या तरुणाची चर्चा सुरु आहे. राजू प्रकाश गोसावी (Raju Prakash Gosavi)असं त्या तरुणाचं नाव आहे. लहानपणी वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईनं मोठ्या जिद्दीनं शिक्षण दिलं. त्याचं आईला पोलिस भरती झाल्यानंतर प्रचंड आनंद झाला आहे.

राजू याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामध्ये त्याचा पाच बहिणी आहेत. राजू तिसरीला असताना वडिलांचा मृत्यू झाला. आता यापुढे घर कसं चालवायचा हा प्रश्न त्याच्या आईला पडला. दुखातून सावलेल्या आईने मोठ्या जिद्दीने संकटाचा सामना करत संसाराचा गाढा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या शेतात मोलमजुरी करून मुलांचे पालन पोषण केलं. त्यावेळी मुलाला शिक्षण द्यायला हवं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी राजूला शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं.

राजूच्या आईचं नावं मंगलं त्यांनी आपल्या मुलांना जमेल तसे शिक्षण दिलं. राजूचे प्राथमिक शिक्षण त्याच्या गावी माळेवाडी येथे झाले आहे. त्याचे कॉलेजचे शिक्षण श्री यशवंत माध्यमिक उच्च मध्य. विद्यालय कोकरूड येथे झाले. शिक्षण घेत असताना राजूला कमी वयामध्ये अनेक संकटाचा सामना करावा लागला. अत्यंत कठीण परिस्थित संघर्ष करत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.

हे सुद्धा वाचा

मासे पकडणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे, लग्नातील मांडव उभारणे, अशी काम करत शिक्षण व घर खर्च चालवला. पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु परिस्थितीमुळे तो हतबल झाला आणि शिक्षण अर्धवट सोडवं लागलं. घरात पाच बहिणी असल्यामुळे घरचा खर्च वाढला होता.

वयाच्या २२ व्या वर्षी राजूच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावलं. दोन मुले झाली एक मुलगा २ री ला एक मुलगी अंगणवाडीला आहे. पोलिस भरतीसाठी राजूने चार-पाच वर्ष प्रयत्न करून ही यश मिळालं नाही. घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी त्याला सरकारी नोकरी हवी होती. त्यांच्या मनात आपल्याला काय करायचं हे फायनल झालं होतं. तो कोकरुड येथील अभ्यास केंद्रात अधिक वेळ घालवू लागला. तिथं थांबून अभ्यास केल्याचा त्याला फायदा झाला.

राजूला यशाबद्दल विचारल्यावर त्याच्या डोळ्यातील येणार पाणी हे त्याच्या सारख्या गरीब परिस्थितीशी संघर्ष करत खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या युवकांचे प्रोत्साहन व प्रेरणास्थान नक्की बनेल. राजुला पोलिस खात्यामध्ये अधिकारी बनायचं आहे. त्याच्या यशामध्ये त्याची खंबीरपणे उभी असणारी आई, बायको, सर्व बहिणी, त्याची लहान मुले यांनी सहकार्य केल्यामुळे हे सगळं शक्य झालं असल्याचं सांगितलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.