Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो!

सांगली : सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ आहे. त्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाण्याच्या शोधात रानातील ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशूपक्षी व्याकूळ आहेत. निसर्गाशी नाळ जोडलेला शेतकरीच या पशू पक्षांची व्याकूळता जाणू शकतो. तासगाव तालुक्यातील  गौरगाव येथील आर पी खराडे यांनी रानातील पक्षांसाठी पाणवठा तयार केला आहे. भांड्यात पाणी भरुन ते घराबाहेर ठेवतात. मोर, […]

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ आहे. त्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाण्याच्या शोधात रानातील ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशूपक्षी व्याकूळ आहेत. निसर्गाशी नाळ जोडलेला शेतकरीच या पशू पक्षांची व्याकूळता जाणू शकतो. तासगाव तालुक्यातील  गौरगाव येथील आर पी खराडे यांनी रानातील पक्षांसाठी पाणवठा तयार केला आहे. भांड्यात पाणी भरुन ते घराबाहेर ठेवतात. मोर, चिमण्या कावळे यासारखे पक्षी पाण्यासाठी येऊ लागले आहेत. पक्षी येत असताना सशासारखा सस्तन प्राणीही पाण्याच्या शोधात रानातून मानवी वस्तीत येत आहे. सशाचं एक लहान पिल्लू पाण्याच्या शोधात चक्क मानवी वस्तीत असलेल्या खराडे यांच्या अंगणात नित्य नियमाने गेले चार दिवस येत आहे.

तासगाव तालुक्यातील गौरगाव हे दुष्काळी गाव, सांगली जिल्ह्यातील साडे तीन लाख लोकांना 173 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी कमी पडत असल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ केवळ माणसांनाच नाही तर डोंगर दऱ्यातील प्राण्यांवरही आहे.

गौरगाव येथील आर पी खराडे या शेतकऱ्याने आपल्या अंगणात ठेवलेले पाणी पिण्यासाठी एक ससा नेमाने  येत आहे. गेल्या चार दिवसापासून हा ससा चांगलाच रुळला आहे. न घबरता तो पाणी पिण्यासाठी जंगलातून चक्क मानवी वस्तीत येऊ लागला आहे.

गौरगावाच्या कडेला डोंगर आहे आणि येथील जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे  पाण्याच्या शोधात राणातील  ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशुपक्षी व्याकूळ झाले आहेत.

ससा, मोर यासारखे पशूपक्षी माणसापासून दूर पळतात,पण कडक उन्हाने पाण्याच्या शोधत त्यांना मनुष्यवस्तीत यावं लागत आहे. तहान भागवण्यासाठी जंगली प्राणी आता जीवाचीही पर्वा करेनासे झाले आहेत.

संबंधित बातम्या 

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू  

सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.