मुलांनी आई-वडीलांच्या कष्टाचे पांग फेडले, वृत्तपत्र विक्रेत्याची दोन्ही मुले प्रशासकीय सेवेत दाखल

सांगलीतील वृत्तपत्र विक्रेत्याची दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाली आहेत. एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या दोन्ही मुलांच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता ही दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाली आहेत. या मुलांनी आपल्या वडीलांनी त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्याग आणि कष्टाचे चीज केले आहे.

मुलांनी आई-वडीलांच्या कष्टाचे पांग फेडले, वृत्तपत्र विक्रेत्याची दोन्ही मुले प्रशासकीय सेवेत दाखल
sangli masal familyImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 12:54 PM

सांगली | 8 मार्च 2024 : आई-वडीलांनी केलेल्या कष्टाचे सार्थक तेव्हाच होते जेव्हा मुले त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात नावलौकीक मिळवितात. सांगलीतील एका वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दोन्ही मुलांनी प्रशासकीय सेवेत दाखल होत आई-वडीलांच्या कष्टाचे चीज केले आहे. त्यामुळे या मुलांसोबत त्यांच्या आई-वडीलांचे देखील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सांगलीच्या उपनगर अभय नगरात राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेते भारत मासाळ यांनी मोठ्या मेहनतीने पहाटे लवकर उठून आपला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय नेमाने चालविला. त्यांच्या दोन्ही मुलांनी ऋुतुजा आणि उमेश यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविला आहे.

घरची परिस्थिती बेताची तरीही आपला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत पैशाला पैसा जोडत अभयनगरात राहणाऱ्या भारत विठोबा मासाळ यांनी सकाळी वृत्तपत्र विक्री त्यानंतर दुपारी छोटेखाणी गॅरेज चालवून आपला मुलगा उमेश आणि मुलगी ऋुतुजा यांना शिक्षण दिले. गरिबीची परिस्थिती असतानाही दिवस-रात्र काबाडकष्ट करून भारत मासाळ यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले त्यांना वह्या-पुस्तके कसलीही कमी पडू दिली नाही. यासाठी त्यांची पत्नी यशोदा मासाळ यांनीही मोठी साथ दिली. कोणत्याही आई-वडिलांचं स्वप्न हेच असते की त्यांच्या मुलांनी आईबापाचं नाव काढावे, हाच उद्देश आणि ध्येय ठेवून भारत मासाळ यांनी जिद्दीन आपल्या मुलांना शिकवलं. परंतू मुलांनी आई-वडीलांचं स्वप्न जिद्दीनं साकार केले.

आपल्या मुलांना गरिबीचे चटके बसू नयेत यासाठी मासाळ दाम्पत्याने मुलांना प्रोत्साहन देत प्रशासकीय सेवेकडे जाण्यासाठी प्रवृत्त केले. आज अखेर भारत मासाळ यांची दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेत दाखल झाली आहेत. त्यांची मुलगी ऋतुजा हिची भूमिअभिलेख अधिकारी पदी निवड झाली आहे. तर मुलगा उमेश हा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाला आहे. आपली दोन्ही मुलं आता प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यामुळे मासाळ कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.