Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार संग्राम जगताप यांना अनिल देशमुखांच्या जागी मंत्री करा, नगरमध्ये ठराव

अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं झालं आहे. त्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावण्यात यावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

आमदार संग्राम जगताप यांना अनिल देशमुखांच्या जागी मंत्री करा, नगरमध्ये ठराव
आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्याची मागणी
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 3:11 PM

अहमदनगर : खंडणी वसूलीच्या आरोपावरुन अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं झालं आहे. त्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावण्यात यावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी तसा ठरावही मांडण्यात आलाय. या ठरावात आमदार संग्राम जगताप यांनी मंत्रिपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. (Give the ministry to MLA Sangram Jagtap, Demand of NCP in Ahmednagar)

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी एक ठराव मांडण्यात आला. त्यात संग्राम जगताप यांची मंत्रिपदी वर्णी लावावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप म्हणाले कि, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना 4 विधानसभा सदस्यामागे 1 मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 विधानसभा सदस्य असूनही प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद मिळाले. हा अहमदनगर जिल्ह्यावर झालेला राजकीय अन्याय आहे. त्यामुळे जगताप यांना मंत्री पद देण्याची मागणी होऊ लागली आहे.

संग्राम जगतापांना शहरातील 8 सिग्नल दत्तक घेतले

अहमदनगर जिल्हा वाहतूक शाखेनं गेल्या वर्षी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करुन दीड कोटीच्या आसपास महसूल गोळा केला होता. या निधीतून महापालिकेला सिग्नल जिर्णोद्धार निधी देण्याची मागणी जागरुक मंचाने केली होती. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील 8 सिग्नल दत्तक घेतले. तसं पत्र त्यांनी जागरुक मंचाला दिलं होतं. शहरात वर्षानुवर्षे बंद असलेले सिग्नल सुरु करण्याची मागणी जागरुक मंचाकडून करण्यात येत होती. त्यानंतर कायनेटिक चौक ते प्रेमदान चौक दरम्यान राज्या महामार्गावरील 8 सिग्नलची देखभाल आणि दुरुस्ती स्वखर्चातून करणार असल्याचं जगताप यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं.

इतर बातम्या :

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक, ‘या’ 5 मुद्द्यांवर खल!

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन

Give the ministry to MLA Sangram Jagtap, Demand of NCP in Ahmednagar

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.