“रामदास कदम दळभद्री नेता”; उद्धव ठाकरे यांच्या सभेत ‘या’ नेत्यानं कदमांची औकात काढली
रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम आता आगामी काळातील निवडणुकीत कसा निवडून येतो तेच बघू असं म्हणून ठाकरे गटातील नेत्यांनी थेट कदम पिता पुत्रांना आव्हान दिले आहे.
खेड/ रत्नागिरीः ठाकरे गटाच्या आजच्या खेडमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेत रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेत ज्या संजय कदम यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी रामदास कदम यांची दळभ्रदी नेता म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या सगळ्या निवडणुका या आता ठाकरे गटाचाच असतील असा विश्वास संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.
गोळीबार मैदानावर झालेल्या सभेच संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी रामदास कदम हा नेता दळभद्री आहे.
त्यामुळे रत्नागिरीतून हे पार्सल आता हद्दपार करणार असल्याचा शब्द संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील आता आगामी निवडणुका चुरशीचा होणार असल्याचे बोलले जात आहे.
ज्या रामदास कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्याच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन रामदास कदम आणि भाजपलाही ठाकरे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे.
रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम आता आगामी काळातील निवडणुकीत कसा निवडून येतो तेच बघू असं म्हणून ठाकरे गटातील नेत्यांनी थेट कदम पिता पुत्रांना आव्हान दिले आहे.
एकीकडे संजय कदम यांनी त्यांना आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे आमदार भास्करराव जाधव यांनीही त्यांनी थेट आव्हान देत आता येथून पुढच्या निवडणुका तुम्ही जिंकून दाखवा असा इशारा देण्यात आला आहे.
तर संजय कदम यांनी म्हटले आहे की, आता रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव यांनी आगामी काळातील निवडणुकीत जिंकून दाखवावं. मात्र आता निवडणुकीतील मतं बघून हे कुटुंब भविष्यात कधी निवडणूक लढविण्याचा विचार करणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.