फडणवीसांचा मोहराच राज्यसभेवर जाणार, हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी योगदान काय? काकडेंचा हल्ला

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राज्यसभेसाठी फिल्डिंग (Sanjay Kakde Rajya sabha Election) लावण्यास सुरुवात केली आहे.

फडणवीसांचा मोहराच राज्यसभेवर जाणार, हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी योगदान काय? काकडेंचा हल्ला
Follow us
| Updated on: Feb 21, 2020 | 4:17 PM

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राज्यसभेसाठी फिल्डिंग (Sanjay Kakde Rajya sabha Election) लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या जागेवर संजय काकडे यांनी दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून उदयनराजेंना (Udayanraje Bhonsale) राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरु असल्याने, संजय काकडे (Sanjay Kakde Rajya sabha Election) यांनी राजेंपेक्षा आपलीच उमेदवारी कशी सरस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

संजय काकडे म्हणाले, “राज्यसभेसाठी मी पक्षाकडून इच्छुक आहे, सहयोगी म्हणून नाही. माझ्या केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे. उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाही”

काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी? मी देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा आहे. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. फडणवीस हेच माझे मोदी आणि शहा आहेत, असंही संजय काकडे म्हणाले.

माझ्या केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे. हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी काय योगदान? हरलेल्या व्यक्तीला भाजप मंत्री करेल असं वाटत नाही. उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाहीत. काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी? असा हल्लाबोल संजय काकडे यांनी केला.

संजय काकडे नेमकं काय म्हणाले?

मला माध्यमातून असं कळतंय की उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नक्की झाली आहे.  पण उदयनराजे यांचं योगदान काय?  उदयनराजे पक्षात आले आणि पडले.  त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आला नाही.

महापालिका,  लोकसभा,  विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यात मिळालेले यश पाहता पक्ष माझा विचार करेल.उदयनराजे भोसले आहेत म्हणून उमेदवार होऊ शकत नाही.  तसा निकष लावला तर आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही.  काकडे हे शिवाजी  महाराजांचे सुभेदार होते.

हरलेल्या माणसाला मंत्रिपद कसं मिळेल.  उदयनराजेंचं योगदान काय?  मला फडणवीस डावलतील असं वाटतं नाही,  डावलल्यावर बघू.  पण उदयनराजेंना 80 वर्षांच्या व्यक्तीने पाडलं जो दहा वर्षं राजकारणात नव्हता.

मी फडणवीसांचा मोहरा आहे. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मोदी आणि शहा.  मी त्यांना म्हटलं की  तुम्हीच माझ्यावतीनं मोदी-शहांना भेटा. भाजपचे राज्यसभेचे तीन उमेदवार निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून येतील,  शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचे एक उमेदवार निवडून येईल.  ही निवडणूक बिनविरोध होईल. मी सहयोगी म्हणून नाही तर भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे.

उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद?

मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सात जागांची मुदत संपणार

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. मात्र निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी सामना रंगणार आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

उदयनराजेंचा दणदणीत पराभव

राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उदयनराजेंचा लाखोंच्या मताधिक्याने विजय झाला होता. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

राष्ट्रवादी विरुद्ध उदयनराजे अशी झालेली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र भाजपच्या तिकीटावर उतरलेल्या उदयनराजेंना पोटनिवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. उदयनराजे (Udayanraje Bhosale Rajyasabha) यांचा 87 हजार 717 मतांनी पराभव करत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील लोकसभेवर निवडून गेेले.

संबंधित बातम्या 

उदयनराजेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचाली, राज्यसभेचं तिकीट मिळण्याची चिन्हं

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.