Shiv sena : ज्यांनी दगा दिला त्यांना जाब विचारायला आलोय, धैर्यशील मानेंच्या घरावरील आंदोलनानंतर संजय पवार सतापले

आम्हाला ज्यांनी दगा दिला त्यांना जाब विचारायला येथे आलोय, असे म्हणत संजय पवार यांनी तीव्र आंदोलन केले. यामुळे कोल्हापुरातलं वातावरण सध्या तापलं आहे.

Shiv sena : ज्यांनी दगा दिला त्यांना जाब विचारायला आलोय, धैर्यशील मानेंच्या घरावरील आंदोलनानंतर संजय पवार सतापले
Shiv sena : ज्यांनी दगा दिला त्यांना जाब विचारायला आलोय, धैर्यशील मानेंच्या घरावरील आंदोलनानंतर संजय पवार सतापलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 4:03 PM

कोल्हापूर : आधी 50 आमदारांच्या (Shiv Sena MLA) आसपास आमदार एकनाथ शिंदे (Cm Ekanath Shinde) यांच्याबरोबर गेले आणि आता खासदार ही शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यातच कोल्हापूर मधील हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे शिंदे गटात दाखल झाल्यामुळे त्या भागातील कार्यकर्ते आणि ठाकरेंसोबतचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या आंदोलकांना कोणतेही उत्तर देऊ नका अशा सूचना माने यांनी त्यांच्या समर्थकांना केल्या, मात्र त्यानंतर संजय पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला ज्यांनी दगा दिला त्यांना जाब विचारायला येथे आलोय, असे म्हणत संजय पवार यांनी तीव्र आंदोलन केले. यामुळे कोल्हापुरातलं वातावरण सध्या तापलं आहे.

पाहा व्हिडिओ

संजय पवार नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा काढण्यात आला. मात्र हा शिवसैनिकांचा मोर्चा खासदारांच्या घराजवळ आल्यानंतर मोर्चेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर संजय पवार हे चांगले संतापले, आम्हाला पोलीस ताब्यात घेत आहेत हे चुकीच आहे राज्यात लोकशाही आहे की नाही? लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहे. असे अनेक आरोप संजय पवार यांनी यावेळी केले. तसेच ज्यांनी दगा दिला त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलोय, त्यामुळे आम्हाला अडवू नका, अशी ही संतप्त प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.

मानेंच्या घराबाहेर बंदोबस्त

बंडखोरांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं

एकनाथ शिंदे यांचा बंड होऊन राज्यात नवं सरकार येऊन अनेक दिवस उलटले आहेत. तरीही राज्यातलं राजकीय वातावरण अजूनही शांत झालेलं नाहीये आणि अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे रोज शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळेच आता त्यांना होणारा विरोधी वाढला आहे. एकनाथ शिंदे यांचा बंड झाल्यानंतर ही त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे पोस्टर अनेक ठिकाणी जाळण्यात आले होते. तसेच त्यांची कार्यालयं फोडण्याचं काम ही शिवसैनिकांनी केलं होतं. आता खासदार ही शिंदे गटात जात असल्याने खासदारांनी विरोधात ही त्या ठिकाणचे स्थानिक शिवसैनिक आणि ठाकरेंसोबत असणारे नेते आक्रमक पवित्रा घेताना दिसून येत आहेत. त्यामुळेच हे संतप्त आंदोलन झालेला आहे. तेच आज कोल्हापुरात दिसून आलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.