Sanjay Raut : ही ऑफर की ट्रॅप? काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि आज संजय राऊत, बंडखोर आमदारांना मुंबईत आणलं की गेम पलटणार?

काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत गुवाहाटीत बंड पुकारलेल्या आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा हेच आवाहन करताना, सरकारच्या पाठिंब्याबाबतही मोठं विधान केलं.

Sanjay Raut : ही ऑफर की ट्रॅप? काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि आज संजय राऊत, बंडखोर आमदारांना मुंबईत आणलं की गेम पलटणार?
संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 3:42 PM

मुंबई : मुंबईतून संजय राऊत यांनी गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेना (Shiv Sena) आमदारांना अल्टिमेटम दिला. शिवाय त्यांची गोची करणारं वक्तव्यही केलं. सरकारमधून (MVA) बाहेर पडण्यास शिवसेना तयार आहे, असं वक्तव्य मी जबाबदारीने करतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलंय. पण त्यासाठी त्यांनी एक अटक घातली आहे. 24 तासांत तुम्हाला मुंबईत यावं लागेल, शिवसेना पक्षप्रमुखांसमोर तुमची जी मागणी आहे, त्यावर चर्चा करावी लागेल. यानंतर आपण मिळून योग्य तो निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. इतकंच काय तर गुवाहाटी बसून केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारालाही त्यांनी टोला लगावलाय. जे काय म्हणणं आहे, ते मुंबईत येऊनच करा, अशा स्पष्ट शब्दांत संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

ऑफर की ट्रॅप?

शिवसेना आमदारांना मुंबईत आणण्यासाठीचं हे ट्रॅप आहे का, अशी शंका आता उपस्थित केली जाते आहे. खरंच ट्रॅप आहे की ऑफर आहे, यावरुन राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या वक्तव्याचे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या आवाहनाला आता एकनाथ शिंदे गट नेमका कसा प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे पत्रकारांना सांगितलं. त्यावेळी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेतेही सोबत होते. या पत्रकार परिषदेच्या शेवटी शेवटी संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्यासाठीची शिवसेनेची तयारी असल्याचं विधान करताना बंडखोर आमदारांसमोर एक प्रस्तावही ठेवला. आता हा प्रस्ताव मान्य करत एकनाथ शिंदे गट येत्या 24 तासात मुंबईत येणार का, हा खरा प्रश्न आहे.

काल ठाकरे, आज राऊत..

काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत गुवाहाटीत बंड पुकारलेल्या आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा हेच आवाहन करताना, सरकारच्या पाठिंब्याबाबतही मोठं विधान केलं. या विधानानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून खरंत शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल का, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपसोबत जायचं नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम होता. ज्या प्रकारे शिवसेनेने गेल्या काळात भाजपवर टीका केली आहे. त्यानुसार संजय राऊतांची वक्तव्य तपासली, तर त्यांनी अनेकदा भाजपविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. आता बंडखोर आमदार सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यास सांगत आहेत. हा निर्णय घेतला गेला, तर भाजपसोबत शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी कितीपत तयार होईल, याबाबतही बंडखोर शिवसेना आमदारांना शंका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून आधी बाहेर पडा, मग पुढचा परतण्याचा विचार करुन, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.