छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ‘हे’ मान्य आहे का? संजय राऊतांचा उदयनराजे आणि संभाजीराजेंना सवाल
भाजपने 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर यावरुन जोरदार गदारोळ सुरु झाला आहे (Comparison of PM Modi and Chhatrapati Shivaji Maharaj). सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर यावरुन जोरदार गदारोळ सुरु झाला आहे (Comparison of PM Modi and Chhatrapati Shivaji Maharaj). सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील यावरुन माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला आहे (Comparison of PM Modi and Chhatrapati Shivaji Maharaj).
जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते.महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? pic.twitter.com/TwoVw45V2h
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… ‘छत्रपती शिवाजी महाराज’. निदान महाराष्ट्र भाजपने तरी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला. काहीतरी बोला.”
आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत?हेच ते जयभगवान गोल.यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! pic.twitter.com/LxWySzDX7s
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असं ‘महान’ पुस्तक लिहून प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जय भगवान गोयल ज्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!, असं म्हणत राऊत यांनी पुस्तकाचे लेखक गोयल यांच्यावर निशाणा साधला.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो बोला.. काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
संजय राऊत म्हणाले, “जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. त्यांनी महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. आता या महाशयांनी शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करुन नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली. हे भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?”
निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही.. एक सुर्य..एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज…छत्रपती शिवाजी महाराज… pic.twitter.com/A2bef0eKWs
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
पुस्तकावर बंदी घाला, अन्यथा वाईट परिणाम : संभाजीराजे छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. (1/2) pic.twitter.com/xyDN7UwUpW
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
या वादानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्षेप घेतला आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घाला, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. संभाजीराजे म्हणाले, “दिल्लीच्या भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मात्र, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होणार नाही. त्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. नाहीतर हा वाद वाढून याचे वाईट परिणाम होतील.”