हा चेहरा घाबरवणारा… गेली गेली 10 वर्षं… संजय राऊत यांचा भाजपच्या जिव्हारी लागणारा हल्ला
अब की बार 400 पार असा भाजपचा नारा आहे. भाजपवाले फक्त नारेबाजी करत आहेत. अखंड हिंदुस्तान करू, पाकव्यापक्त काश्मीर हिंदुस्थानात आणू, चीनला धडा शिकवू, असे नारे नरेंद्र मोदी देत होते. त्यांचं काय झालं असा सवाल विचारत यांच्या नाऱ्यांच एक पुस्तक काढायला पाहिजे, असा टोला राऊत यांनी हाणला.
भाजपची गेल्या १० वर्षांपासून सत्ता आहे. एक चेहरा लोकं दहा वर्षांपासून बघत आहेत, लोकं त्यांना वैतागलेली आहेत. हा चेहरा परत येणार नाही, हा चेहरा (देशासाठी) घाबरवणारा आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावत भाजपवरही टीकास्त्र सोडले. निवडणुकांचा निकाल येऊ द्या, हा चेहरा कुठे जातो ते बघा, असेही ते म्हणाले.
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार आहे. आज दुपारी मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होईल. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव लोकसभा अधिक रंगतदार आणि शिवसेनेला विजयाच्या दिशेने हमखास घेऊन जाणारा हा पक्षप्रवेश आहे.
उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने जळगावचे शिवसेना ही मजबुतीने पुढे जाईल, त्यांची ताकद शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावत शिवसेनेचा खासदार या वेळेला प्रथमच जळगाव मध्ये लोकसभेला निवडून येईल यांची आमच्या मनात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ही भाजपची पडझड नाही तर भाजपचा वृक्ष मुळापासून उखडेल, हा पक्ष मुळापासून कोसळले असेही राऊत म्हणाले.
त्यांच्या नाऱ्यांचं एक पुस्तक काढायला पाहिजे
अब की बार 400 पार असा भाजपचा नारा आहे. भाजपवाले फक्त नारेबाजी करत आहेत. आता काही दिवसांनी नारे देण्याच्या लायकीचा ही राहणार नाहीत. अखंड हिंदुस्तान करू, पाकव्यापक्त काश्मीर हिंदुस्थानात आणू, चीनला धडा शिकवू, असे नारे नरेंद्र मोदी देत होते. त्यांचं काय झालं असा सवाल विचारत यांच्या नाऱ्यांच एक पुस्तक काढायला पाहिजे, असा टोला राऊत यांनी हाणला. गर्जना आणि नारेबाजी यामध्ये खूप फरक आहे. आमच्या गर्जना आहेत आणि वाघाच्या डरकाळ्या आहेत. त्यामुळे त्यांना जेवढी नारेबाजी करायची तेवढी करू द्या असंही संजय राऊत म्हणाले.