उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले (Sanjay Raut on Udayanraje Bhonsale) यांच्यावर हल्लाबोल केला.
पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले (Sanjay Raut on Udayanraje Bhonsale) यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांची लोकमत दैनिकातर्फे जाहीर मुलाखत घेण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी पुस्तक वादावरुन उदयनराजेंवर (Sanjay Raut on Udayanraje Bhonsale) हल्ला चढवला. संजय राऊत म्हणाले, उदयनराजे हे माजी खासदार आहेत. शरद पवार हे जाणते राजे आहेत, त्यांना लोकांनी उपाधी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाची मालकी राहू शकत नाही. उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे”, असा हल्ला राऊतांनी केला.
शिवसेनेने पक्षाला नाव देण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न विचारताना उदयनराजेंनी शिवसेनेला ठाकरे सेना नाव लावण्याचा सल्ला दिला होता.
ही महाविकास आघाडी आहे की महाशिवआघाडी आहे? कारण उदयनराजे म्हणाले की शिव हा शब्द काढून टाकला, याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “ते काय बोलतात साताऱ्यात, ते त्यांचा प्रश्न आहे. लोकशाही आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेताना शिवशाहीही म्हणतो. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. त्या पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत”.
प्रश्न – उदयनराजे असेही म्हणतायेत की शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं.
संजय राऊतांचं उत्तर- ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा विचारायला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून.
अजित पवार स्टेपनी, आमची गाडी घसरणार नाही : संजय राऊत
आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती, सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, असं म्हणत ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी हशा पिकवला. अजूनही मला पत्रकार म्हणवून घेणं पसंत आहे, नेता आणि खासदार नाही, माझी तीच ओळख कायम असावी, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या