आम्हाला दलाल म्हणताय काय ? शिंदे गटात गेलेल्या पदाधिकऱ्यांनं राऊत यांचं मागचं पुढचं सगळंच काढलं, एकनाथ शिंदे पाहतच राहिले…
शिंदे गटात नाशिकमधून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्यानं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात असून संजय राऊत यांचं हे अपयश असल्याची चर्चा आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडला असून त्याकरिता पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती यावेळी होती. याच प्रवेशावर संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले सर्व दलाल असल्याचे म्हंटले आहे. संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या अजय बोरसे यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. आम्हाला एक व्यक्ती दलाल म्हंटली, ते नाशिकला पर्यटनासाठी येतात, शिवसेना पक्षाचे वाटोळं तुम्ही केलं आणि सिल्वर ओक चे तुम्ही दलाल आहात आम्हाला जास्त बोलायचे नाही, आमच्यावर बोलाल तर आम्हीही बोलू अशा स्पष्ट शब्दात अजय बोरस्ते यांनी सुनावलं आहे. याशिवाय नाशिकचा विकास खुंटला होता, मात्र चार महिन्यांपासून आम्ही बारकाईने बघत होती अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री आम्हाला लाभले आहे. नाशिकच्या विकासासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोरस्ते यांनी म्हंटले आहे.
जामीन झाल्यानंतर संजय राऊत यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन वेळेस नाशिक दौरा केला, नाराज नगरसेवकांची मनधरणीही केली.
मात्र, राऊत यांच्या डॅमेज कंट्रोलला यश आले नाही, राऊत यांची नाशिककडे पाठ फिरताच शिंदे गटात जाण्यासाठी माजी नगरसेवकांनी मुंबईची वाट धरली होती.
ठाकरे गटाच्या अकरा नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बाळसाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे गटात नाशिकमधून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्यानं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात असून संजय राऊत यांचं हे अपयश असल्याची चर्चा आहे.
ते आधीच गेले होते. तीन लोकांची हकालपट्टी आम्ही आधीच केली आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून काही लोक गेले. त्यातील काही दलाल आहेत अशी टीका राऊत यांनी केली होती.
जमिनीचे व्यवहार करणारे. लालच आणि कमी कुवतीचे लोक आहेत. त्यांना निष्ठा आणि श्रद्धा नाही. जे गेले आहेत त्यांचा व्यवसाय दलाल आहेत असं राऊत यांनी म्हंटले होतं.
याच टीकेला शिंदे गटात दाखल झालेल्या अजय बोरस्ते यांनी सीएम शिंदे यांच्या समोरच संजय राऊत यांना टोला लावत खडेबोल सुनावले आहे.