नरेंद्र मोदींना विरोधक नकोत, देशात पुतिन मॉडेल आणायचं आहे – संजय राऊतांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पदाची प्रतिष्ठा खूप खाली आणली आहे. मोदींना लोकसभा , विधानसभेच्या निवडणुका या विरोधकांशिवाय हव्या आहेत. त्यांना देशात पुतिन मॉडेल आणायचं आहे अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केली.

नरेंद्र मोदींना विरोधक नकोत, देशात पुतिन मॉडेल आणायचं आहे - संजय राऊतांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 11:16 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पदाची प्रतिष्ठा खूप खाली आणली आहे. मोदींना लोकसभा , विधानसभेच्या निवडणुका या विरोधकांशिवाय हव्या आहेत. त्यांना देशात पुतिन मॉडेल आणायचं आहे असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. मोदींना देशात विरोधक नकोत, त्यांना निवडणुकाही विरोधकांशिवायच हव्या आहेत असेही राऊत म्हणाले.

रशियामध्ये संविधान नाही, तिथे विरोधक नावालाही दिसत नाहीत. तसंच पुतिन मॉडेल पंतप्रधान मोदींना निवडणुकीनंतर या देशातही आणायचं आहे . पण आम्ही ते होऊ देणार नाही. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले संजय राऊत ?

प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे, ती देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. प्रधानमंत्री यांनी इतकं खोटं बोलू नये या मताचे आम्ही आहोत. राजकारणात लोकं खोटं बोलतात, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तींना मर्यादा, त्या पदाची प्रतिष्ठा पाहिली पाहिजे. राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदेमध्ये देखील विरोधकांना महत्त्व आहे हे मोदी मानायला तयार नाही हा संविधानाला धोका आहे. मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हवे आहेत. मोदिना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचे आहे. मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका हे संविधानाला सर्वात मोठा खतरा आहे. खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, धमकी द्यायची. सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे हाच सर्वात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

सांगलीत धर्मांध शक्ती बळावत आहे

महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा अद्याप कायम आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस नेते विश्व विश्वजीत कदम यांना हा निर्णय मान्य नाही. याच मुद्यावरू महाविकास आघाडीत अद्याप धूसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केले.

अजित कदम असतील, विशाल पाटील असतील, त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो .काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्ष सांगलीत काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली. प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो आणि दंगली घडवल्या जातात. सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल तर तिकडे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे , असं राऊत म्हणाले. या शक्तींशी मुकाबला करायचा असेल तर तिकडे शिवसेना हवी. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना शिवसेनेला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे , असंही राऊत यांनी नमूद केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.