हे तर पिसं गेलेले कावळे, आमचा पक्ष, आमची भूमिका स्पष्ट, संजय राऊत कडाडले

वीर सावरकर यांच्यावरून काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, ' सावरकर हे श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील.

हे तर पिसं गेलेले कावळे, आमचा पक्ष, आमची भूमिका स्पष्ट, संजय राऊत कडाडले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 11:07 AM

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर (Sawarkar) यांच्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलेले खडे बोल म्हणजे मॅच फिक्सिंग होती, अशी इतर सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतेय. संजय राऊत यांनी या पक्षांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे पक्ष नव्हे तर पिसं गेलेले कावळे आहेत. आमचा पक्ष आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. या विषयावर मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवरून शिवसेनेने परखड भूमिका घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट येऊ शकते, अशी चर्चा आहे. मविआ फुटण्याच्या चर्चांबाबत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तुमचा जुगार सुरु ठेवा..

संजय राऊत यांनी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे. मालेगावात झालेल्या विराट सभेने आमचा पक्ष काय आहे, हे दाखवून दिलंय. महाराष्ट्रात तुमचंच जे मॅच फिक्सिंग चाललंय, जो जुगार सुरु आहे, तो चालू ठेवा, असा सल्ला राऊत यांनी टीका करणाऱ्या पक्षांना दिला आहे.

‘..यांच्या कांद्याला ५० कोटींचा भाव’

नाशिकचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांचीच नार्को टेस्ट करा, कोणत्या कंपनीकडून ठाकरे यांनी किती पैसे घेतले, हे समोर येईल, असं वक्तव्य केलंय. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ ज्यांच्या कांद्याला ५० कोटीचा भाव घेतला तेअसं म्हणतायत. पण इकडे शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय, हे आधी पहा. मालेगावच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार हे उघड झालंय.

सदू आणि मधू भेटले..

मालेगावत एकिकडे उद्धव ठाकरे यांची सभा सुरु असतानाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत यांनी मात्र या भेटीवरून खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ सदू आणि मधू भेटले. भेटू द्या. जुने मित्र असतील. नव्याने प्रेम उफाळून आलं असेल. महाराष्ट्रात मालेगावात जी सभा होती, त्यामुळे भावना उचंबळून आल्या असतील. एकमेकांचे अश्रू पुसायला गेले असतील. आम्ही काय करू?

फडणवीस-ठाकरे भेट

विधानभवन परिसरात फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतूनही राजकीय चर्चांना उधाण आलंय. संजय राऊत यांनी यावरून परखड टीका केली आहे. या भेटीमुळे ज्या चर्चा सुरु आहेत, त्यांचं राऊत यांनी खंडन केलंय. ते म्हणाले, ‘ मला लोकसभेत मोदी रोज भेटतात. अमित शाह, जेपी नड्डा, मोदी-आमचा, फडणवीस-आमचा रस्ता तोच आहे. विरोधी पक्ष-सत्ताधाऱ्यांना वेगळा रस्ता अजून तरी नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

राहुल गांधी यांना भेटणार..

वीर सावरकर यांच्यावरून काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, ‘ सावरकर हे श्रद्धेचा विषय आहेत. ते नेहमीच राहतील. ज्या प्रकारे त्यांनी देशासाठी शिक्षा भोगली आहे. जेलमध्ये जाऊन आलो आहोत. आता ती व्यक्ती जिवंत नाही. सावरकर िवंत असते तर आपलं म्हणणं मांडू शकले असते. अशा व्यक्तीवर चिखलफेक केल्यास महाराष्ट्रातील जनता करारा जवाब देऊ शकते. तुमच्या सगळ्याच लढायात आम्ही सोबत असू पण सावरकरांकडूनच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. सावरकरांच्या बाबतीत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही बोललो. लवकरच मी दिल्लीत जाणार आहे. राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा करेन.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.