चोरांची माफी मागतो म्हणत संजय राऊत यांची नवी टीका, एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना पुन्हा डिवचलं
चोरमंडळ म्हंटल्यानंतर संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होत असतांना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर पुन्हा नवी टीका केली आहे.
कोल्हापूर : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासोबतच्या आमदारांना चोर म्हणणं हा चोरांचा अपमान आहे. कालपासून अनेक लोकं म्हणत आहे त्यांना तुम्ही चोर कसं काय म्हणू शकतात. हा चोरांचा अपमान आहे हे खरं त्यामुळे मी समस्त चोरांची माफी मागतो असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना डिवचलं आहे. याशिवाय त्यांच्यावर पुन्हा नवी टीकाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली आहे. चोर नका म्हणू त्यांना दरोडेखोर म्हणा असे मला लोकं सांगत होते. आणि ते खरं आहे पण चोर आणि दरोडेखोर यांना निष्ठा असते. एखाद्या चोराने किंवा डाकू ने शब्द दिला चोरी करणार नाही तर तो करत नाही. दरोडेखोर आणि चोर शब्दाला पक्के असतात असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
मला काल पासून लोकांनी हैराण केलं आहे. की तुम्ही चोरांचा अपमान केला आहे. चोरांचा माझ्याकडून अपमान झाला त्याबद्दल मी माफी मागतो म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर टीका करत असतांना चोरमंडळ म्हंटलं होतं त्यावरून संपूर्ण राज्यात संजय राऊत यांच्याविरोधात भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार टीका करत निषेध व्यक्त केला होता.
राऊत यांचा निषेध करून हे प्रकरण थांबले नाही. संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली करण्यात आल्या. त्यानंतर सभागृहात संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यासाठी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
त्यानंतर उशिरा संजय राऊत यांच्यावर भाजपकडून हक्कभंग दाखल करण्यात आला असून त्याबाबत चौकशी करण्यासाठी समितीही गठित करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
इतकेच काय संजय राऊत यांची दहा मिनिटे सुरक्षा काढून घ्या ते उद्या दिसणार नाही असे खुली धमकीच आमदार नीतेश राणे यांनी सभागृहात दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याही चोर म्हणून अपमान केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत असतांना संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना पुन्हा डिवचण्याचे काम केले आहे. त्यात चोर नाहीतर दरोडेखोर म्हणा असं लोकं सांगत असतात असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.