न्यायालयाला अडचण किंवा दबाव असेल तर आम्ही… ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

आमची मागणी आहे जर खरी शिवसेना कोणती हा निर्णय घ्यायला तुम्हाला अडचण असेल तर हा निर्णय जनतेला घेऊ द्या असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

न्यायालयाला अडचण किंवा दबाव असेल तर आम्ही... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 1:01 PM

रत्नागिरी : आमच्या वकिलांनी आमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. आमची बाजू सत्याची असल्यामुळे लपवाछपवी आणि खोटे पुरावे करून बाजू मांडण्याची गरज नाही. आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे जे मत आहे तेच माझं मत आहे. कशाला ही झंजट करायची निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. लोकं ठरवतील शिवसेना कोणती आहे. जर न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला निर्णय घेतांना काही अडचण असेल, दबाव असतात बाकी काय असतं. निवडणुका घेऊन आणि कौल घेणं अशावेळी हा एकच मार्ग असतो असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हंटलं आहे.

40 लोकं गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही. विधिमंडळ पक्षातील काही लोकं बाजूला जाणं किंवा आमदार फुटणं म्हणजे शिवसेना फुटणं असे नाही. शिवसेना गावागावात, जिल्ह्यात आहे. आमदार गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही.

आमची मागणी आहे जर खरी शिवसेना कोणती हा निर्णय घ्यायला तुम्हाला अडचण असेल तर हा निर्णय जनतेला घेऊ द्या आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

चाळीस आमदार असो नाहीतर चार आमदार असूद्या पक्षांतर हे पक्षांतर असतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार म्हणजे होणार त्यामुळे गोंधळ असल्याने हा निकाल लांबणीवर जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

2024 मध्ये राजकीय बदल झालेला दिसेल. देशातील राज्यातील वातावरण सध्या वेगळं आहे असे देखील संजय राऊत यांनी सांगत राज्यातील सत्तासंघर्षावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय संजय राऊत यांनी थेट न्यायालयावर भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलत असतांना थेट न्यायालयावरच बोटं ठेवलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या या भूमिकेवरुन राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही भूमिका घेतली आहे.

सलग तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयाने मंगळवारी पुन्हा सुनावणी घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. सात न्यायमूर्तीच्या खंडपीठा समोर हा निर्णय व्हावा अशी मागणी ठाकरे गटाने केली होती, मात्र आता पाच न्यायमूर्तीच्या खंडपिठासमोर हा निर्णय होणार आहे.

एकूणच मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट न्यायालयाच्या भूमिकेवरच बोट ठेवलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.