संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, न्यायालयाचा निर्णय विरोधातच येईल असं समजूनच… काय म्हणाले राऊत…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू असून त्याकडे संपूर्ण राज्यसह देशाचे लक्ष लागून असतांना संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, न्यायालयाचा निर्णय विरोधातच येईल असं समजूनच... काय म्हणाले राऊत...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 2:53 PM

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद सुरू आहे. पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशाचे या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. अशातच टीव्ही 9 भारतवर्षच्या मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांनी चिन्ह आणि पक्षाचे नाव गेले यावर भाष्य करत असतांना हे वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांच्या या विधानाने राजकीय व्यक्तींच्या भुवया उंचावल्या जाईल असं हे वक्तव्य आहे.

खरंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला होता. त्याच्या विरोधातही उद्धव ठाकरे यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे चिन्ह आणि पक्षाचे नाव पुन्हा मिळेल अशी उद्धव ठाकरे गटाला अशा आशा आहे.

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये सर्वोच्च नायलय आशेचा किरण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणत आहे. अशातच संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात जाईल असे माहीत होते अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत मुलाखतीत उत्तर देतांना म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या विरोधात येईल असे समजून आम्ही चाललो आहेत. आम्ही लढणारे लोक आहेत. त्यामुळे आम्ही आशा निर्णयाला घाबरत नाही. चिन्ह आणि पक्षाचे नाव गेले पण आमच्याकडे ठाकरे नावाचा ब्रॅंड आहे. त्याच्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असं राऊत म्हणाले आहे.

याशिवाय संजय राऊत यांनी यावेळेला अंधेरीच्या पोटणीवडणुकीचेही उदाहरण दिले आहे. पक्षाचे नाव बदलले, चिन्ह मशाल होते. त्यावर आम्ही निवडणुका लढलो आणि जिंकलो सुद्धा. त्यामुळे आम्ही लढणारे लोकं आहोत अशा कुठल्याही निर्णयाला घाबरत नाही असे म्हंटले आहे.

अलिकडच्या काळात सोशल मीडिया आहे, मीडिया आहेत. त्यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह पोहचायला वेळ लागत नाही असे म्हणत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच भाष्य केले आहे. त्यामुळे पुढील काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.