“शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने ‘हा’ विषय पेटवला” – संजय राऊत
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी विधाने आल्याने त्यावरून राज्यभर पडसाद उमटत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विधाने समोर आली आहे. याच वादग्रस्त विधानावरून राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यावरून माफी मागा अशी मागणी करत असतांना आम्ही भडकावतोय असं म्हणतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अवमान असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे. संजय राऊत यांनी यावरून भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. आणि मी जर भडकावले असे जर ते पुन्हा म्हणत असतील तर पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले आहे. तुमच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आणि काय भावना हे दिसून येत आहे. राज्यातील वातावरण तापलेले असतांना भाजपचा डीएनए चेक करायला पाहिजे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा तापलेला असतांना भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा बाजूला करण्यासाठी कर्नाटक सीमा वादाचा विषय हाती घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
कर्नाटक सीमा प्रश्नाचा मुद्दा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेला अपमानाची तीव्र भावना कमी करण्यासाठीच भाजपने ही भूमिका घेतल्याचा सुरही संजय राऊत यांनी आवळला होता.
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल तर त्याविषयी आम्ही आक्रमक होणारच असेही संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी विधाने आल्याने त्यावरून राज्यभर पडसाद उमटत आहे.