कसाब आणि जिंदाल संजय राऊत यांना का आठवले? थेट दोघांशी तुलना करून संजय राऊत म्हणाले…
संजय राऊत यांनी जेलमध्ये माझ्यापेक्षा अबू जिंदाल आणि कसाबला चांगली व्यवस्था होती असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी खळबळजनक दावा केला आहे. माझ्यापेक्षा अजमल कसाब ( Ajmal Kasab ) आणि अबू जिंदालला ( Aabu jindal ) चांगली व्यवस्था होती असं म्हंटलं आहे. पण मी कधीही त्याच्यावर बोललो नाही. मला त्याच्यावर बोलायचे नाही असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना जवळपास 100 दिवसापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावे लागले होते. त्यादरम्यान संजय राऊत यांना चांगली व्यवस्था नसल्याचा आरोपच एकप्रकारे संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी जेलमध्ये माझ्यापेक्षा अबू जिंदाल आणि कसाबला चांगली व्यवस्था होती असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना म्हंटलं आहे.
संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यादरम्यान संजय राऊत यांचा जवळपास शंभर दिवस मुक्काम हा ईडीच्या कोठडीत होता.
संजय राऊत यांच्यावर यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही अटक केली होती. त्यामध्ये संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच असा दावा केला आहे.
संजय राऊत यांनी जी नावं घेतली ते दोघेही अतिरेकी आहेत. त्यामध्ये अबू जिंदाल आणि अजमल कसाब यांनी मुंबईत हल्ला केला होत्या, त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना दोघांना जेलमध्ये ठेवण्यात आले होते.
याशिवाय संजय राऊत यांनी प्रत्येकाचा जबाब घेतला जातो, नंतर काही प्रकरणात अटकही होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही अटक झाली होती. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही जबाब घेण्यासाठी येऊ शकतात, त्यांना एखाद्या प्रकरणात चौकशी होऊ शकते असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
एकूणच संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधत जेलमध्ये चांगली वागणूक दिली नाही असा सुर राऊत यांचा होता. याशिवाय संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी जेलमध्ये काय काय घडलं यावर कधीतरी बोलेल असे म्हंटले होते.
जेलमध्ये असतांना संजय राऊत यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यातून हा संपूर्ण उलगडा केला जाणार असल्याची चर्चाही समोर आली होती. त्यामुळे संजय राऊत हे पुस्तकात काय लिहितात त्यातून कुणावर हल्लाबोल करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.