जे खासदार सोडून गेले…म्हणजे त्यांनी राजकीय कबर खोदली…संजय राऊत यांनी हातवारे करत कुणाला म्हंटले प्यारे झाले ?
राऊत म्हणाले पक्षाचे विषय होतात. म्हणून खात्रीने सांगतो. जे खासदार सोडून गेले त्यांनी स्वतची राजकीय कबर खोदली. गेले ते आता. ते प्यारे झाले. अशी टीका गोडसे यांच्यावर केली आहे.
नाशिक : हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का ? शिवसेना हे नाव चेहरा आहे, शिवसेना नावाची चार अक्षरं चेहरा आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवाय जे सोडून गेले आहे त्यांनी त्यांची राजकीय कबर खोदली आहे. असं म्हणत असतांना संजय राऊत यांनी ते प्यारे झाले आहे असं म्हणत जहरी टीका केली आहे. याशिवाय मी खात्रीने सांगतो, माझा शब्द आहे. ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. खासदार गोडसे यांचं तर राजकीय करीयरच संपलं आहे. आम्हीच ती जागा लढवली होती. जे आमदार गेले. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं ना. हा आत्मविश्वास कुठून येतो. आम्ही फिरतो. लोकांमध्ये बसतो. त्यातून त्यांची चीड दिसत आहे. त्यावरून आत्मविश्वास येतो. सर्व जागेवर आहे. काही पालापाचोळा उडून गेला असेल. तो उडतच असतो. आज या गटात उद्या त्या गटात. हे काही नवीन नाहीये. शिवसेना आहे तशीच आहे असं संजय राऊत म्हणाले आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी शिंदे गटावर जहरी टीका करत असतांना पक्षाच्या पदाधिकारांच्या बैठका राऊत यांनी घेतल्या आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असतांना संजय राऊत यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना टोला लगावला आहे.
राऊत म्हणाले पक्षाचे विषय होतात. म्हणून खात्रीने सांगतो. जे खासदार सोडून गेले त्यांनी स्वतची राजकीय कबर खोदली. गेले ते आता. ते प्यारे झाले. अशी टीका गोडसे यांच्यावर केली आहे.
हेमंत गोडसे काय चेहरा होता काय. शिवसेना हाच चेहरा. शिवसेना चार अक्षर हा चेहरा. चार अक्षर ताकद आणि लाखो शिवसैनिकांवर खासदार आमदार निवडून येतात.
गट निर्माण करून निवडून येत नाही. खासदार विकले जातात, आमदार विकले जातात. जनता नाही असंही संजय राऊत म्हणाले आहे.