चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का?, शपथविधीची तारीख जाहीर केल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल

Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का?, शपथविधीची तारीख जाहीर केल्याने संजय राऊत यांचा संतप्त सवाल
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 11:24 AM

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबतची चर्चा महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या पाच तारखेला शपथविधी होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरून बावनकुळे यांना टोला लगावला आहे. भाजपचे प्रांत अध्यक्ष सांगत आहेत की पाच तारखेला शपथविधी होणार आहे. हे काय राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का?, असा सवाल थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे. राज्यपालांनी यांना सांगितलं आहे का? राज्यपाल यांनी कळविले आहे का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला तयार नाही का घाबरले आहात का? याला सर्वस्वी जबाबदार डी वाय चंद्रचूड आहेत. सुप्रीम कोर्ट आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

शिंदेंचं सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललं आहे. जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून महाराष्ट्र असेल, संबळचा विषय हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य करून देशांमध्ये एका प्रकारची आग लावली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं तर डी वाय चंद्रचूड होते. आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजी वाहू सरकार आहे केअरटेकर गव्हर्मेंट हे देखील संविधानाच्या खिलाफ आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

26 तारखेला या सरकारची, 14 व्या विधानसभेची मुदत संपलेली आहे. विधानसभेची नवीन विधानसभा 26 तारखेला नवीन सरकार हे अस्तित्वात येणं हे घटनेनुसार आवश्यक होतं. पण त्यांचे भाडोत्री पंडित काहीही कागदपत्र आणून दाखवतील… आम्ही जर असतो. आमचं सरकार असतं तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावली असती हे मी वारंवार सांगतो, असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.

राऊतांचा भाजपला टोला

अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून आठ दिवस होऊन गेले. यांना एवढं बहुमत आहे, यांनी निकालानंतर 24 तासात सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. अद्याप यांच्या कोणीही सरकार स्थापनेच्या दावा का केला नाही? यांच्याकडे बहुमत आहे ना… मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष इतका मोठा नेते इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.