देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय असेल? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपद तसंच महाविकास आघाडीबाबतही राऊतांनी महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर.....

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले...
देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:15 AM

महाराष्ट्राचा कारभार पुढच्या पाच वर्षांसाठी महायुतीच्या हाती असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. 230 जागा जिंकम महायुती राज्यात सत्तेत आली आहे. मात्र निकाल लागून पाच दिवस झालेले असताना देखील महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर दावा करत होते. मात्र काल पत्रकार परिषद घेत त्यांनी मोदी-शाहांच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं म्हटलं. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील असल्याचं कळतंय. मात्र अद्यापर्यंत त्याची घोषणा झालेली नाही. अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला.

मुख्यमंत्रिबाबत संजय राऊत काय म्हणाले?

मुख्यमंत्री कोण हे आणखी ठरत नाही. 200 पेक्षा जास्त जागा येऊन पण मुख्यमंत्री ठरत नाही भाजपला पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडल आहे हे जनतेला समजत नाही. आम्ही आजही मानत नाही की हा जनतेचा कौल आहे. राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच समजत नाही. शिवसेना स्वतःला समजनाऱ्यानी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकर नाहीत. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं, असं संजय राऊत म्हणालेत. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. त्यामुळं जो होईल त्याच स्वागत करावं लागेल. पण तो कोण होईल हे दिल्ली ठरवेल, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री कोण हे आणखी ठरत नाही. 200 पेक्षा जास्त जागा येऊन पण मुख्यमंत्री ठरत नाही. भाजपला पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्री पद का लटकून पडल आहे हे जनतेला समजत नाही. आम्ही आजही मानत नाही की हा जनतेचा कौल आहे. राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच समजत नाही. शिवसेना स्वतःला समजनाऱ्यानी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचे आधिकर नाहीत. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं, असं संजय राऊत म्हणालेत.

महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटातील काही शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आलं. महाविकास आघाडी अजिबात फुटणार नाही. आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काही कार्यकर्त्यांची वेगळ लढवी अशी भूमिका असते. लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा झाला, विधानसभेला का फायदा झालं नाही हे एकत्र बसून ठरवू. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. हे जिंकले त्यांची ही भूमिका नाही. जे पराभूत झाले आहेत त्यांना अस वाटणं चूक नाही. भविष्यात काय होईल ते बघू, असं राऊत म्हणालेत.

'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.