महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut on Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी वारंवार हे सांगत आलो आहे. एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता. पण एकनाथ शिंदे यांनी कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमा भागातील लोकांची गाऱ्हाणी ऐकली नाहीत. किंवा मंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा काय आहेत? हे समजून घेतलं नाही. मी तिकडे गेलो होतो. मला तिथं अटक झाली. आमच्या सरकारच्या काळात मी वारंवार तिकडे गेलो. तेव्हा मला अटक झाली माझ्यावर खटले दाखल झाले. पण मी घाबरलो नाही. पण आपल्याला अटक होईल. पोलिसांचे दंडुके खावे लागतील. म्हणून हे तिकडे गेले नाहीत. अटकेच्या भीतीने हे तिकडे गेले नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता
बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 100 पेक्षा जास्त पोलीस धर्मवीर संभाजी महाराज चौकात दाखल झाले आहेत. महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने संभाजी महाराज चौकात एकत्र येत निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इशाऱ्यानंतर कर्नाटक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
निवडणुकीच्या आधी कोणतीही शहनिषा न करता सरसकट १५०० रुपयांचा व्यवहार केला त्यावर अनेकांचे आक्षेप होते. मुख्यमंत्री यांनी २ दिवस आधी सांगितल होत की निकष बदलावे लागतील. निकष, नियम यांचं भान राहिलं नाही त्यांना मत विकत घ्यायची होती. अनेक कमावत्या महिलांचं उत्पन्न चांगल आहे अशा घरातील ३ महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे जाताहेत.काही लाख महिला आता त्यांच्या समोर आले. काही लाख महिलांना आतापर्यंत पैसे दिल्यावर हे लक्षात आलं का? आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिले ते परत घेऊ नका, असं संजय राऊत म्हणालेत.
राऊतांचा समाजवादी पार्टीवर निशाणा
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आहेत त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेला मदत केली. फक्त राज्यसभेवेळी त्यांची मत आम्हाला मिळाली नाही. मानखुर्दला मी प्रचाराला गेलो. आमच्यावर उमेदवार देण्यासाठी प्रेशर होता पण आम्ही आघाडी म्हूनुन उमेदवार दिला नाही. आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडून आले नसते, असंही राऊत म्हणालेत.