गौतम अदानी काल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले अन्…; संजय राऊतांचा मोठा आरोप

Sanjay Raut on Gautam Adani and Devendra Fadnavis : गौतम अदानी काल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच या बैठकीच्या आधारे राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. वाचा सविस्तर...

गौतम अदानी काल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले अन्...; संजय राऊतांचा मोठा आरोप
देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 10:28 AM

उद्योगपती गौतम अदानी हे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा लचका तुटला जाणार आहे. तो आता जकात नाक्याच्या रूपाने तुटला जात असल्याचं आपण पाहत आहोत. कोण आहेत गौतम अदानी? याआधी जकातनाके महाराष्ट्राने चालवले. पण आता ते अदानींनाच का दिले जात आहेत? कुणाच्या दबावाखाली आपण काम करताय. अदानींना हा सगळा महाराष्ट्र गिळता यावा, म्हणून तुम्ही गैर मार्गाने सत्तास्थापन केली, असं संजय राऊत म्हणालेत.

अदानी- फडणवीस भेटीवरून राऊतांचा निशाणा

उद्योगपती गौतम अदानी यांनी काल सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये दीडतास चर्चा झाली. या भेटीवरून राऊतांनी घणाघात केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र अदानीच्या घशात घालायचा आहे. यांची लायकी बघा यांना जकात नाके चालवायचे आहेत… विमानतळ, जकात नाके, भाजी दुकान हे सगळ अदानी चालवत आहेत. आम्ही आता आवाज उठवायचा नाही का? काल अदानी फडणवीस यांना भेटले तेव्हाच लक्षात आलं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

सत्ताधारी सभागृह चालू देत नाही हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदानी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्या नुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असं संजय राऊत म्हणालेत.

पडळकर- खोत यांच्यावर राऊत बरसले

माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये काल महायुतीच्या नेत्यांची सभा झाली. यात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे या सभेला उपस्थित होते. यावेळी बोलताना खोत आणि पडळकरांनी शरद पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. या टीकेचा संजय राऊतांनी समाचार घेतला. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या बद्दल अशी विधान शोभतात का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की त्यांना ही भाषा वापरायला त्यांनी सांगितली आहे का? कोकणातील टिल्लू गब्बर सिंग अशी भाषा वापरतात. हे राज्याला शोभणार नाही, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.