2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून राऊतांचा सवाल

| Updated on: Dec 13, 2024 | 11:02 AM

Sanjay Raut on PM Narendra Modi : संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?, असं राऊत म्हणालेत. अजित पवारांबाबत संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?; वन नेशन, वन इलेक्शनवरून राऊतांचा सवाल
नरेंद्र मोदी, संजय राऊत
Image Credit source: ANI
Follow us on

केंद्र सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता लवकरच हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेसाठी येणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 2025 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या योजना नरेंद्र मोदी यांच्या आहेत. त्याच्यातलीच एक म्हणजे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही त्यांची संकल्पना… या देशामध्ये संघराज्यपद्धती आहे. प्रत्येक राज्याची सामाजिक, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगळं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

‘वन नेशन, वन इलेक्शन’वर राऊत काय म्हणाले?

जम्मू काश्मीरची निवडणूक तुम्ही लोकसभेबरोबर घेऊ शकत नाही. ईशान्येकडे तुम्ही एकत्र निवडूक घेऊ शकत नाही. काही राज्यात तुम्ही सात- सात टप्प्यात निवडणुका घेत आहात. फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेत आहात. राज्याचे प्रश्न वेगळे असतात आणि देशाचे प्रश्न वेगळे असतात. त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं. हे आपण 70-75 वर्षांपासून पाहत आहोत. तुम्ही मुंबई महानगर पाहिलेची निवडणूक अद्याप घेऊ शकलेला नाहीत. तुम्ही महाराष्ट्रातील स्थानि स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेतल्या नाहीत. कारण तुम्हाला हारण्याची भीती वाटते , असं संजय राऊत म्हणालेत.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक तुम्ही आणलेलं आहे. कॅबिनेटमध्ये मंजूरही केलात पण मी जबाबदारीने बोलतो 2029 ला ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा फंडा असताना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का? असा मला प्रश्न आहे. त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर हल्ला केला आहे. इतिहासाने त्यांना माफ केलेले नाही, असं राऊत म्हणालेत.

अजितदादा- शरद पवार भेटीवर काय म्हणाले?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल वाढदिवस होता. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी चर्चा होऊ लागली. यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. अजित पवार बरोबर जाणं आणि भाजपसोबत जाणं हे एकच आहे. मी शरद पवारसाहेबांना ओळखतो. जवळजवळ मी रोजच असतो. त्यांच्यासोबत संसदेत राज्यसभेत त्यांचा आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे.कुणीतरी फार ठरवून हे बसण्याची जागा निश्चित केलेली आहे. पवारसाहेब पुरागामी महाराष्ट्राचा विचार घेऊन पुढे जाणारे नेते. ते असा निर्णय घेणार नाहीत, असं राऊत म्हणाले.