मुंबई : आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदा जेवढ्या गाजत तेवढ्या राऊतांच्या गाजतात(Sanjay Raut press conference). शिवसेनेच्या (Shiv sena Bhavan) भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत रोज विरोधकांवर हल्ले चढवतात. आता त्यांच्या टार्गेटवर भाजप नेते तर आहेतच, पण त्याचबरोबर आता ईडीचे अधिकारीही (ED)आहेत. त्यांनी ईडीच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा फाडणार असा थेट इशारा आज होणाऱ्या पत्रकार परिषदेआधी दिलाय. राऊतांची मागची पत्रकार परिषदही अशीच गाजली होती. गेल्या वेळी तर थेट एलईडी स्क्रीन लावत राऊतांनी जंगी पत्रकार परिषद घेतली होती. संजय राऊत यांनी यापूर्वी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या हे होतं. त्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोम्मया आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. गेल्या काही दिवसांमधील महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत नेमक काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.
राऊतांचे टार्गेट काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारनं त्यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतील आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात ट्विस्ट?
केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतोय असा दावा करत संजय राऊत यांनी त्यांच्याकडील पुरावे पीएमओकडे दिल्याचं म्हटलं होतं. काही अधिकारी खंडणीचं रॅकेट वसुली एजंटातर्फे चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद चांगलीच वादळी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसात राज्यात संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या सामना रंगला आहे. आता हा सामना ईडी विरुद्ध संजय राऊतही होण्याची शक्यता आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरण यात नवे ट्विस्ट आणते का ? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Video | ‘ कामगारांना बांबू लावणार असाल तर आम्ही तुम्हाला बांबू लावू’ सदाभाऊ खोत यांचा घणाघात
राज्यातील महिला अत्याचाराचा महिला दिनीच वाचला पाढा! काय म्हणाल्या, भाजप नेत्या चित्रा वाघ…