रक्तबंबाळ… संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट, भाजप पुरस्कृत गुंडांचा हल्ला? फडणवीसांना काय इशारा?

Sanjay Raut | संजय राऊत यांनी बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केलाय. या हल्ल्यामागे भाजप पुरस्कृत गुंड असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.

रक्तबंबाळ... संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट, भाजप पुरस्कृत गुंडांचा हल्ला? फडणवीसांना काय इशारा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 4:07 PM

दिनेश दुखंडे,  मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अत्यंत खळबळजनक ट्विट केलंय. 5 मार्च रोजी झालेल्या एका हल्ल्याचा उल्लेख राऊत यांनी या ट्विटमध्ये केलाय.एका गरीब मुलीवरचा हा हल्ला भाजप पुरस्कृत गुंडांनी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. गरीबांच्या मुली अशाप्रकारे रस्त्यावर पडल्या आहेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलाय. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनाच राऊत यांनी सवाल विचारलाय. ही घटना ५ मार्च रोजीची असून आरोपी अजूनही मोकाट आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांचं ट्विट काय?

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच एक धक्कादायक ट्विट शेअर केलंय. यात एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसतेय. तिचे कपडे रक्ताने माखलेले दिसतायत. तर आजूबाजूलाही रक्ताचे डाग दिसतायत. राऊत यांनी ट्विट केलंय… देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला … आरोपी मोकाट आहेत.

काय घडली होती घटना?

सोलापूर जिल्ल्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ही घटना आहे. एका अल्पवयीन मुलीवर आगोदर बलात्कार आणि नंतर तिच्या कुटुंबियावर आरोपींनी हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती.  अद्यापही मुलीवर उपचार सुरु असून आता या घटनेचे पडसाद विधान परिषदेमध्ये उमटले आहेत. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण तर वाढत आहेच पण आरोपींना मोकाट सोडल्याने पिडीत मुलीच्या कुटुंबियारही हल्ला झाल्याचं म्हटलं जातंय. संजय राऊत यांनी याच घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.