‘एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार टेस्ट ट्यूब बेबी, टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले’, संजय राऊत यांचा घणाघात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख थेट 'टेस्ट ट्यूब बेबी' असा केलाय. त्यामुळे शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

'एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार टेस्ट ट्यूब बेबी, टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले', संजय राऊत यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:11 PM

कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या कोल्हापूरच्या (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख थेट ‘टेस्ट ट्यूब बेबी’ असा केला. “हे सगळे 40 टेस्टट्युब बेबी आहेत. त्यांचा नेताही टेस्ट ट्यूब बेबी आहे. तुम्ही पाहा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, तेजच नाही. त्यांचे ना बापसे होत..काय! त्यांचे जरा चेहरे बघा. हे सगळे टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले आहे”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी घणाघात केला. त्यांच्या या टीकेवर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

“हे सगळे 40 टेस्ट ट्यूब बेबी आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली. त्याच माणसांचे सरदार केले. रिक्षा चालवायचे, कोण कोंबड्या चोरायचे, कोण चुना लावायचे. आमची सर्व ताकद शिवसेना या चार अक्षरात आहे. संजय पवार तुमच्या निष्ठेबद्दल महाराष्ट्राला माहिती आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. “आम्ही गर्जना करायला नाही गर्जना ऐकायला आलोय. महाराष्ट्राच्या घराघरांत एकच गर्जना आहे. निवडणुका येऊ द्या मग दाखवतो. आमची सत्ता येऊ द्या. ज्यांनी निकाल दिला त्याला चुना लावायला पाठवू. मी निर्भीडपणे बोलतो. परिणामांची काळजी करत नाही”, असा इशारा राऊतांनी दिला.

हे सुद्धा वाचा

“आपण सुरू केलेलं शिवसेनेचं महानाट्य महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापुरात चोर-लफंग्यांना स्थान नाही. माझ्या आयुष्याची 40 वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेले. आज जो काही संजय राऊत लोकांना माहिती आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय झालं नसतं”, असंदेखील संजय राऊत म्हणाले.

‘हिंदुत्ववादी सरकारने या 40 रेड्यांनी अश्रू गाळले नाहीत’,  ऱाऊतांचा घणाघात

“महाराष्ट्राची देवी कमी पडली म्हणून गुवाहाटीला गेलात का? सुरतला पहिला हप्ता 25ml घेतलं. गोव्यात तर वेगळंच काहीतरी सुरू होतं. रेड्यांचा बळी दिला. पण मग कोल्हापुरात 52 गाई मेल्या ते बघा. मंत्री गुलाब पाटील यांच्या तोंडून 90 ml चं सत्य बाहेर पडले. 52 गाईंचा मृत्यू झाला तरी हिंदुत्ववादी सरकारने या 40 रेड्यांनी अश्रू गाळले नाहीत. भाजप आणि शिंदे गटाने याचा विरोध केला का? या घटनेचा शाप त्यांना लागणार. बाळासाहेब ठाकरें सारख्या पुण्यत्माचा शाप लागणार”, अशी टीका राऊतांनी केली.

“बाळासाहेबांचा विरोध पाकिस्तानला होता. या देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांना नाही. आमचा पक्ष फोडला नाही तर तो विकला. त्यांना शिवसेनेवर सूड उगवायचा होता. जे जे शिवसेनेचं आहे ते शिवसेनेकडेच राहील. हे गद्दार मातीत गाडले जातील. शिवसेना आणि ठाकरे ब्रँड हा देशातील राजकारणातील मोठा ब्रँड आहे. तुमच्या पक्षावर, चिन्हावर निवडून आले आणि हे हरामखोर सोडून गेले. हिंमत असेल तर परत निवडून या. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी हिम्मत असेल तर राजीनामे द्यावेत”, असं आव्हान त्यांनी दिलं.

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...