Breaking News | आणखी 4 वॉशिंग मशीनची ऑर्डर, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, मविआचे आणखी आमदार फुटणार?

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत.

Breaking News | आणखी 4 वॉशिंग मशीनची ऑर्डर, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, मविआचे आणखी आमदार फुटणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 11:50 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज असंख्य घडामोडी घडतात. काही सूचक संकेत देणाऱ्या असतात तर काही थेट परिणाम दर्शवणाऱ्या. काही नेत्यांनी केलेली वक्तव्य चर्चेच्या केंद्रस्थानी असतात तर काही भाष्य गांभीर्यानं घ्यावीच लागतात. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची वक्तव्यदेखील अनुभवी नेता, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार म्हणून महत्त्वाची असतात. त्यामुळेच आज संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भाजपने आणखी ४ नव्या वॉशिंगमशीनची ऑर्डर दिली आहे. तसेच निर्मला वॉशिंग पावडरचीदेखील ऑर्डर दिली आहे, असं संजय राऊत म्हणालेत. राऊतांच्या या वक्याचे नेमके काय अर्थ आहेत, याचे कंगोरे तपासून पाहिले जात आहेत.

राऊत यांचा सूचक इशारा?

इतर पक्षांतील जे आमदार, नेत्याविरोधात कायदेशीर अथवा इतर कारवाई सुरु असेल त्या व्यक्तीचा भाजपात किंवा मित्रपक्षात प्रवेश झाल्यास या नेत्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून घेतलंय, असा आरोप विरोधक करत असतात. त्यामुळे संजय राऊत यांच्या या वक्तव्यातून असं सूचित होतंय की, भाजप किंवा मित्रपक्षात आणखी काही आमदारांचा समावेश होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

वक्तव्याची पार्श्वभूमी काय?

संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याची पार्श्वभूमीही पहावी लागेल. भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राऊतांनी हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात सध्या भाजप-शिंदे युतीचं सरकार आहे. सुप्रीम कोर्टात या सत्तासंघर्षाची केस प्रलंबित आहे. निकाल शिंदेंविरोधात लागला तर कधीही सरकार कोसळू शकतं, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीने बहुमताचा दावा ठोकल्यास काय होईल, अशी चर्चा सुरु आहे. जळगावमध्ये बोलताना बावनकुळे यांनी यावर मोठं भाष्य केलंय. शिंदे-भाजपचं सरकार बनलं तेव्हा आमच्याकडे 164 चा आकडा होता. मात्र आता बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास आमचा आकडा 184 पर्यंत जाईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. बावनकुळे यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तर संजय राऊत यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता आणखीच चर्चा सुरु झाली आहे.

राजकारणात वेगवान घडामोडी

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एक महत्त्वाची बैठक काल पार पडली. तर शरद पवार यांच्या अनेक मुद्द्यांवर बदललेल्या भूमिकांवरूनही प्रश्नचिन्ह उभं केलंय जातंय. त्यातच अजित पवार आणि भाजपची जवळीक होऊ शकते, अशाही वावड्या उठतायत. मध्यंतरी अजित पवारांनी एकाएकी सर्व दौरे रद्द केले. तब्बल 17 तासांनी ते माध्यमांसमोर दिसले. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं, मात्र अजित पवार काही आमदारांसोबत गायब झाल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्याविरोधात काय कारवाई होईल, अशी एकिकडे चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील वेगवान घडामोडींतून काही सूचक संकेत मिळतायत का, हेही तपासून पाहिलं जातंय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.