आग पाणी आणि शिवसेनेशी खेळू नये असं म्हणत संजय राऊत यांचा रोख कुणावर? नाशिकमधील भाषणात तूफान फटकेबाजी…
हे सरकार जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल असा टोलाही राऊत यांनी दीपक केसरकर यांना लगावला आहे. यातला एकही परत निवडून येणार नाही असा दावाही राऊत यांनी केला आहे.
नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी लावत शिंदे गटावर हल्लाबोल करण्याची एकही संधी राऊत सोडत नाहीये. त्याच दरम्यान त्यांनी एका भाषणात शिंदे गटाचे कोणही परत निवडून येणार नसल्याचे म्हंटले आहे. मुंबई, नाशिक आणि ठाणे सुद्धा शिवसेनेचेचं आहे. ठाणे महपालिकेत आता निवडणुका झाल्या तरी आमची सत्ता येणार आहे. यांना ॲम्बुलन्समध्ये जावं लागेल, हे अपात्र ठरतील. हे आजचं मरण उद्यावर ढकलतायत, न्याय द्यायची वेळ येईल तेव्हा न्यायदेवचा हातोडा यांच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकायचे प्रयत्न होतायत अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
हे सरकार जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल असा टोलाही राऊत यांनी दीपक केसरकर यांना लगावला आहे. यातला एकही परत निवडून येणार नाही.
गद्दारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, ही निष्ठावंतांची शिवसेना असल्याचे सांगत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला जुना किस्सा सांगितला.
शिवसेना बरखास्त करा आणि काँग्रेसमध्ये विलीन करा अन्यथा तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हंटलं होतं, बाळासाहेबांनी प्रस्ताव आणणाऱ्या माणसाचं थोबाड फोडलं होते
बाळासाहेबांनी ४ चाकू सुऱ्या वालयांवर ही शिवसेना उभी केली आहे. खरे अग्निवीर शिवसेनेमध्ये आहेत असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे ठिणग्या आहे, उद्धव ठाकरे हा माणूस किती संघर्ष करतोय, आजारपणात पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, त्यांना हात हलवता येत नाही बोलता येत नव्हतं, त्यावेळी यांनी पक्ष फोडला असा दावा राऊत यांनी केला आहे.
याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, शिवसेना या आगीशी खेळू नका, ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा आपण बँड बाजा देऊ, शिवसेना महासागर, पवित्र आहे.
आग पाणी आणि शिवसेनेशी खेळू नये, आम्ही इतिहास घडवणारे लोक, तुम्ही बेईमान आहात कसली क्रांती केली, क्रांती आता जनता करेल उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहून, आता तयारी केली पाहिजे स्वबळावर 185 निवडून आणण्याची असेही राऊत म्हणाले आहे.