कोण रुपाली पाटील? मुंबईत 72 व्या मजल्यावर बंगला? संजय शिरसाट म्हणाले होऊ द्यात चौकशी

तुम्ही तुमच्या भाषणात संज्या, घोडा म्हणणार, हे तुमच्या संस्कृतीला चांगलं वाटतं का? वरातीचा घोडा, लाडाने संज्या म्हणतो, असं अंधारे म्हणतात, पण तिचे हेच संस्कार आहेत का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय. 

कोण रुपाली पाटील? मुंबईत 72 व्या मजल्यावर बंगला? संजय शिरसाट म्हणाले होऊ द्यात चौकशी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 12:00 PM

मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे (Sambhajinagar) शिंदे समर्थित शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईत 72 व्या मजल्यावर कुणासाठी बंगला घेतलाय, या प्रश्नाने राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre) यांनी मोठा गौप्यस्फोट करत संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता संजय शिरसाट यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कोण रुपाली पाटील, मी तिला ओळखतही नाही. तिला भेटलोही नाही, मुंबईत घर नाही घ्यायचं तर काय रस्त्यावर रहायचं का, असा सवाल शिरसाट यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करायची असेल तर खुशाल करावी, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.

घर कसं घेतलं चौकशी करा…

रुपाली पाटील यांच्या आरोपानंतर संजय शिरसाट म्हणाले, ‘ माझी तिची भेट झालेली नाही. मुंबईत दोन घरं कशासाठी घेतले, असं विचारतायत. मग मी कुठं रहायला पाहिजे. कसं घेतलं याची चौकशी करा. काही महिलांना वाटतं की स्वातंत्र्य फक्त यांना दिलंय. त्यांनी कुणाबद्दल काहीही बोलावं हे चालणार नाही, असा इशारा शिरसाट यांनी दिलाय.

माझ्याविरोधात आंदोलन करणार..

त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून माझ्याविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना आल्याची माहितीही कळाली आहे. लोकांमध्ये खोट्या बातम्या पसरवून यांना स्टंटबाजी करायची आहे. त्यांना यातून प्रसिद्धी मिळवायची आहे, असा आरोप शिरसाट यांनी केलाय.

अंधारेंना साडी चोळी

सुषमा अंधारे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्यापूर्वी मी तिला बहीण म्हणून साडी चोळी दिली होती. हे नातं जपणारे आम्ही लोकं आहोत. मात्र तुम्ही तुमच्या भाषणात संज्या, घोडा म्हणणार, हे तुमच्या संस्कृतीला चांगलं वाटतं का? वरातीचा घोडा, लाडाने संज्या म्हणतो, असं अंधारे म्हणतात, पण तिचे हेच संस्कार आहेत का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय.

माझ्या मुला-बाळांना काय वाटलं असेल?

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. मला घोडा, संज्या म्हणतेय पण हे ऐकून माझ्या मुला-बाळांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना काय वाटलं असेल, असा उद्विग्न सवाल संजय शिरसाट यांनी केलाय.

‘त्या’ वक्तव्यानंतर महिला नेत्या आक्रमक

संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत. ती बाई सर्वांना माझे भाऊ म्हणते. पण तिने काय काय लफडे केले आहेत, काय माहिती, असं धक्कादायक विधान शिरसाट यांनी केलं होतं. अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असं म्हणाले होते… आजकाल सोशल मीडियावर कुणीही आम्हाला गद्दार म्हणतं, अरे घरात बघ चाललंय, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरून महिला नेत्यांनी शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.