फडणवीसांनी ‘नो पेंडन्सी’चं ट्विट का केलं? संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलं…

जणू काही या सरकारची सगळी प्रलंबित कामं उरकून टाकायची आणि नव्या बदलासाठी तयार व्हायचं.. देवेंद्र फडणवीसांच्या त्या फोटोवरून, ट्विटवरून असा अर्थ काढला जातोय.

फडणवीसांनी 'नो पेंडन्सी'चं ट्विट का केलं? संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 6:20 PM

मुंबई: राज्यात सरकार बदलाच्या हालचाली घडत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केलेलं सूचक ट्विट आज चर्चेचा विषय ठरतंय. सरकार दफ्तरी असलेली सगळी कामं उरकून टाकायची. नो पेंडन्सी अशा आशयाचं ट्विट फडणवीसांनी केलं. जणू काही या सरकारची सगळी प्रलंबित कामं उरकून टाकायची आणि नव्या बदलासाठी तयार व्हायचं.. देवेंद्र फडणवीसांच्या त्या फोटोवरून, ट्विटवरून असा अर्थ काढला जातोय. मग एकनाथ शिंदे समर्थकांचं काय? एकनाथ शिंदे आणि आमदार अपात्र ठरले तर भाजपने प्लॅन बी तयार ठेवलाय, त्यासाठीच अजित पवारांशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं सध्याचं चित्र आहे. त्यात फडणवीसांनी केलेलं हे सूचक ट्विट, यावर शिंदे गटाने थेट प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, फडणवीसांच्या ट्विटचा तसा अर्थ नाहीये. कोणतीही कामं पेंडिंग ठेवायची नाहीत, असे त्यांचे आदेश आहे. एवढा साधा अर्थ आहे…

संजय शिरसाट काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात हे सामान्यांचं सरकार स्थापन झालंय. लोकांचा आमच्यावर विश्वास वाढतोय म्हणून गर्दी वाढत आहे.लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. अडीच वर्ष फाईल पेंडीग होत्या म्हणून देवेंद्रजींनी तसे ट्वीट केले. त्यांचे सर्व मंत्र्यांना आदेश आहेत की सर्वसामान्यांच्या फाईल्स पेंडीग ठेवायच्या नाही. यात सरकारमध्ये फेरबदल आहे असे नाही. उलट काही लोक आम्हाला जोडले जातील, हे आठ दिवसापासून जे चालू आहे, त्यावरुन कळले असेलच… असं वक्तव्य करून शिरसाट यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

संजय राऊत प्रवक्ते…

दरम्यान, अजित पवार यांनी कालदेखील विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या आमदार आणि नेत्यांसोबत बैठक घेतली. काल सकाळपासून सुरु झालेली खलबतं दुपारपर्यंत चालली. अखेर अजित पवार यांनी मी कुठेही जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा खुलासा केला. तर माध्यमांनाही आता या बातम्या बंद करा, असं आवाहन केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असल्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या संजय राऊतांनाही टोला हाणला. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्याविषयीच बोला. आम्ही तुम्हाला वकिलपत्र दिलेली नाही, असं वक्तव्य केलंय. यावरून संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत काय ठरले हे त्यांचे संजय राऊत नावाचे प्रवक्ते आहे त्यांना विचारा, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.