संतोष देशमुख हत्याप्रकरणात घुले, सांगळेला अटक, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं? संदीप क्षीरसागरांचा मोठा गौप्यस्फोट

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात घुले, सांगळेला अटक, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं? संदीप क्षीरसागरांचा मोठा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 2:58 PM

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.  या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. आज अखेर या घटनेतील दोन मुख्य आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.  सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोप कृष्णा आंधळे अजून फरार आहे. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड देखील पुण्यातच सीआयडीच्या टीमला शरण आला होता. या प्रकरणात त्याच्यावर देखील आरोप होत आहेत. दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले आहेत, या मोर्चात बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले संदीप क्षीरसागर? 

संतोष आण्णा यांचा फोटो पाहिल्यावर माझं डोकच सटकलं, मी त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो आणि पुढची भूमिका घेतली. या प्रकरणात जो कोणी आहे तो वाल्मिक कराडच आहे.  6, 9 आणि 11 तारखेचे सीडीआर तपासा यामध्ये फक्त वाल्मिक कराडच नाही तर अजून खूपजण सापडतील. ज्यांना अटक झाली, त्या सर्वांना फिल्मीस्टाईल पद्धतीनं अटक झाली आहे.  मात्र आता हा परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचा आहे.

हे आरोपी बाहेर कुठे नव्हते तर पुण्यातीलच एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. ते  बेडवर झोपून हा सगळा तमाशा पाहात होते. मी 8 दिवसात त्या हॉस्पिटलचे नाव सांगतो, फक्त तेथील सिसिटीव्हीचा तपास करा. आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरलो तेव्हा ते फरार झाले, असा गौप्यस्फोट संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक  

या प्रकरणात आज पुण्यातून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. सुदर्शन घुले हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून ते फरार होते, मात्र पोलिसांनी आता आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, मात्र तरी देखील या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे.

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.