Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध, पण संतोष देशमुख… महायुतीच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

हा अहवाल विकास करणारा अहवाल आहे. सोनिया गांधींनी आदिवासींची माफी मागावी. ⁠त्या पुअर लेडी नाही तर पॉवरफुल लेडी आहेत", असेही रामदास आठवलेंनी म्हटले.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध, पण संतोष देशमुख... महायुतीच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान
walmik karad dhananjay munde (1)
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 6:15 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांनाही मकोका लावण्यात आला आहे. या सर्व हत्याकांडामागचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आता यावर एका केंद्रीय मंत्र्यांने थेट विधान केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नुकतंच धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे एकमेकांसोबत घनिष्ठ संबंध होते. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा थेट संबंध असेल असं मला वाटत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी पंजाबमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेवरही भाष्य केले. पंजाबच्या अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे पुतळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आता यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

“या घटनेला भगवंत मान यांचे सरकार जबाबदार”

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अपमानाची घटना घडली, ती अत्यंत निषेधार्ह आहे. मी 19 तारखेला भेट दिली होती. याबद्दल प्रशासनाशी चर्चा केलेली आहे. या घटनेला भगवंत मान यांचे सरकार जबाबदार आहे. येत्या 26 जानेवारीला बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान होणे निषेधार्ह आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

“सोनिया गांधींनी आदिवासींची माफी मागावी”

“आर्थिक पाहणी अहवाल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा अहवाल बेरोजगारी दूर करणारा अहवाल आहे. हा अहवाल विकास करणारा अहवाल आहे. सोनिया गांधींनी आदिवासींची माफी मागावी. ⁠त्या पुअर लेडी नाही तर पॉवरफुल लेडी आहेत”, असेही रामदास आठवलेंनी म्हटले.

“मलाही राजकारणात यायचं नव्हतं”

“नामदेव महाराज जे म्हणाले, ते योग्य आहे. ते राजकारणात आले नसते तर संत झाले नसते हे खरं आहे. मलाही राजकारणात यायचं नव्हतं , मला सिनेमात हिरो व्हायचं होतं. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध घनिष्ठ होते. त्या मर्डर सोबत धनंजय मुंडे यांचे थेट संबंध असेल असं मला वाटत नाही”, असे रामदास आठवले म्हणाले.

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.