वाल्मिक कराडला घेऊन जात असताना कोर्टाबाहेर गदारोळ, संतोष देशमुखांचे समर्थक आक्रमक

कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यानंतर वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत  घेऊन जात असताना संतोष देशमुख आणि वाल्मिक कराडचे समर्थक आमनेसामने आले. 

वाल्मिक कराडला घेऊन जात असताना कोर्टाबाहेर गदारोळ, संतोष देशमुखांचे समर्थक आक्रमक
walmik karad police custody
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 7:22 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यानंतर वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत  घेऊन जात असताना संतोष देशमुख आणि वाल्मिक कराडचे समर्थक आमनेसामने आले.

नेमकं काय घडलं?

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज बीड कोर्टात ही सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आले. यावेळी कोर्टाबाहेर संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड या दोघांचे समर्थक जमा झाले होते. यावेळी संतोष देशमुख यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी अनेकांनी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या, संतोष देशमुखांना न्याय मिळायला हवा, वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहिजे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यता आली.

आमच्याबरोबर महिला आहेत. आमची एकच मागणी आहे की या पद्धतीने जनतेचा आक्रोश झाला तरच या प्रकरणाचा निकाल लागेल. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. देवेंद्रजी तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारा, अशी मागणी वकील हेमा पिंपळे यांनी केली.

बीडमध्ये तणावाचे वातावरण

संतोष देशमुख यांच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनानंतर आता वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी कोर्टात आवारातच घोषणाबाजी केली. वाल्मिक अण्णांवरचे खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. वाल्मिक कराडचे समर्थक मोठ्या संख्येने परळीत रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे कोर्टाच्या आवारातही वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचे कार्यकर्ते जमलेले होते. यावेळी विरोधात काही घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यामुळे कोर्टाबाहेर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. यामुळे सध्या बीडमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.