मोठी बातमी! संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख डिप्रेशनमध्ये, प्रकृती खालावली; तब्येतिबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची तब्येत बिघडली आहे, त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांनी स्वत: आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. 164 चा जवाब मला द्यायचा आहे, परंतु तब्येत खालावल्यामुळे अशक्तपणा आला आहे, डीहायड्रेशन झाले आहे. त्यामुळे हॉस्पिटलला जाणार आहे, तपासणीसाठी. मी फीट असेल तरच आज जवाब देणार आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान घरातली परिस्थिती त्यात सारखा भावाचा विचार येतो. बाहेर निघालं की जीवाला त्रास होतोय, कधीच आम्ही एकमेकांना सोडून कोणतं काम केलं नाही. मला डिप्रेशन आल्यासारखं वाटत आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. धनंजय देशमुख हे आज रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. यावर देखील यावेळी धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री साहेब आणि उज्वल निकम यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आमची मागणी होती उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या माहिती मिळेल. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, योग्य रीतीने सगळं कामकाज सुरू आहे, पोलीस असतील SIT असेल CID असेल, न्यायालय समिती स्थापन झाली आहे आणि आता उज्वल निकम यांची नियुक्ती हे सगळं न्याय देण्याच्या भूमिकेत आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
खंडनीच्या घटनेत जे आरोपी आहेत, त्यांना जर योग्य शिक्षा झाली असती, ते कायदा व सुववस्था यांच्या कचाट्यात सापडले असते, तर पुढची घटना घडली नसती. पुढच्या काळात कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. या भागात एखादी पोलीस चौकी असायलाच पाहिजे, जेणेकरून काही गोष्टी झाल्या तर अलर्ट राहता येईल, लोकांना अडचणी येणार नाहीत. लोकांना आपल्या तक्रारी दाखल करता येईल, लोकांची सोय होईल अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.