सातारा जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक, दोन दिवसात 108 कोरोनाबाधित

अवघ्या दोन दिवसातच साताऱ्यात 108 नवे रुग्ण आढळले होते. ‬साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 309 वर पोहोचला (Satara Corona Cases Update) आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे त्रिशतक, दोन दिवसात 108 कोरोनाबाधित
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 10:20 PM

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाने त्रिशतक पार केले (Satara Corona Cases Update) आहे. साताऱ्यात आज दिवसभरात 31 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 309 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 120 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून कोरानाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत (Satara Corona Cases Update) आहे. साताऱ्यात काल एका दिवसात तब्बल 77 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आज 31 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसातच साताऱ्यात 108 नवे रुग्ण आढळले होते. ‬दरम्यान साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 309 वर पोहोचला आहे.

साताऱ्यात जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत ही वाढ झाली आहे. आतापर्यंत 7 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हयात प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सातारा जिल्ह्याचे कोरोना हॉटस्पॉट म्हणून कराड तालुक्यातील म्हासोली गावाला ओळखलं जातं. या गावात दोन महिन्यांपूर्वी मार्चमध्ये आलेल्या एका युवकामुळे म्हासोली गावातील 16 जणांना कोरोनाची लागण झाली होती. हा युवक ढेबेवाडी विभागातील अनेक गावात फिरल्यामुळे आजूबाजूच्या गावातही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जिल्ह्यातील म्हासोली गावाला ओळखले जाते.

सध्या सातारा जिल्ह्यात 114 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 157 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान जिल्ह्यात 334 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत जिल्हयात एकूण 4931 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार 

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

राज्यात आज दिवसभरात 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण (Satara Corona Cases Update) आहेत.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष, पुण्यात 21 वर्षीय तरुणाने रुग्णालयात 30 मिनिटात प्राण सोडले

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.