सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यांसह धार्मिक, राजकीय, सामाजिक स्वरुपाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात कोरोनाचा हॉटस्पॅाट ठरलेल्या पाटणमध्ये लग्नानंतर धिंगाणा घालण्यात आला. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांनी कारवाई केली. (Satara Corona Hot Spot Patan Post Wedding DJ Party)
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॅाट ठरलेल्या पाटण कोयनानगर विभागातील रासाटी गावात हा प्रकार घडला. लग्नानंतर रात्री डीजे लावून वऱ्हाडी मंडळींची नाचगाणी सुरु होती. या धांगडधिंग्याचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता.
तहसीलदार-पोलिसांची धडक कारवाई
पाटणचे तहसीलदार आणि पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित व्यक्तींना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोयनानगर विभागात आजपर्यंत कोरोनामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. फोटो-व्हिडीओ पाहून सजग प्रशासनाने केलेल्या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ :
लग्नासंबंधी नियम काय?
लग्नासाठीही आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
2 तासांत लग्न उरका!
यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे.
या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचटा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत नियमांचं उल्लंघन करुन लग्नसोहळा, बीएमसीची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडासह गुन्हा दाखल
(Satara Corona Hot Spot Patan Post Wedding DJ Party)