कोरोना काळात 225 ‘पॉझिटिव्ह’ गर्भवतींची प्रसुती, कराडच्या कृष्णा रुग्णालयात नर्स झाल्या ‘यशोदा’

कराडच्या कृष्णा रुग्णालयात 225 गर्भवती महिलांनी कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला (Karad Hospital Corona Positive Mothers )

कोरोना काळात 225 'पॉझिटिव्ह' गर्भवतींची प्रसुती, कराडच्या कृष्णा रुग्णालयात नर्स झाल्या 'यशोदा'
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 3:01 PM

कराड : कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात 225 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींनी बाळांना जन्म दिला. मात्र कोरोनाग्रस्त मातांच्या आपल्या नवजात बाळांचा सांभाळ करण्यात अडथळे होते. अशा वेळी हॉस्पिटलमधल्या नर्सेसनी मातृत्वाची ऊब देत अर्भकांचा सांभाळ केला. कृष्णा रुग्णालयातील परिचारिकांनी जणू यशोदा होत बाळगोपाळांना सांभाळले. (Satara Karad Hospital manages Babies of 225 Corona Positive Mothers in Pandemic)

कोरोनाच्या काळात माणसांची अनेक रुपं समोर आली. त्यात काही वाईट होती तर काही चांगली होती. असंच माणुसकीचं मन हेलावणारं रुप कराडच्या कृष्णा रुग्णालयात बघायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात या हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या 225 महिलांनी बाळांना जन्म दिला. मात्र स्वतःला संसर्ग झाला असल्याने त्यांना बाळांना सांभाळता येत नव्हते. अशावेळी त्यांच्या पिल्लांना हॉस्पिटलमधल्या नर्सेसनी यशस्वीपणे संभाळलं आहे.

कोरोना पॉझिटिव्ह बाळंतीणींसमोर आव्हान

कोरोना काळात अनेक जणांना अडचणींना सामोरं जावं लागलं. कोरोनाची लागण झाली असताना प्रसुत झालेल्या बाळंतीणींनाही अशाच त्रासाचा सामना करावा लागला. बाळाला जन्म दिला की बाळ आईसोबत ठेवता येत नाही. आईच्या हातात बाळ देणं तर दूरची गोष्ट. कुठला नातेवाईकही बाळाच्या जवळ जाऊ शकत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होते.

नर्सच्या पुढाकाराने प्रश्न मिटला

कराडच्या कृष्णा रुग्णालयात 225 गर्भवती महिलांनी कोरोनाची लागण झाली असताना बाळांना जन्म दिला. या नवजात बाळांना सांभाळायचे कसे आणि कुणी हा प्रश्न होता मात्र हॉस्पिटलमधल्या नर्सनी पुढाकार घेऊन याची जबाबदारी घेतली. या छोट्याशा पिल्लांना आठ-दहा दिवस या नर्सेसनी आपल्या पंखाखाली घेतले आणि यशस्वीपणे जपलंही.

कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने कोविडचा ताण असतानाही बाळांच्या आई पूर्ण कोरोनामुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पिल्लांची जबाबदारी घेतली. यासाठी लागणारे मनुष्यबळही पुरवले. त्यामुळे ह्या स्टाफचं काम अभिमानस्पद आहे. कोरोनाच्या काळात दिसलेल्या माणुसकीच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रुप. या बाळांना मिळालेली मातृत्वाची ऊब अमूल्य आहे.

आई गमावलेल्या बाळासाठी बाळंतीण महिलांकडून दूध

दुसरीकडे, बाळाला जन्म देऊन नागपुरात आईने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या नवजात अर्भकाच्या आयुष्याची दोर बळकट व्हावी, म्हणून अनेक अज्ञात हात पुढे सरसावले आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी वैद्यकीय किंवा आर्थिक सहाय्याची गरज नव्हती, तर आईच्या दूधाची आवश्यकता होती. त्यामुळे अनेक बाळंतीण महिलांनी प्रिमॅच्युअर बाळासाठी आपले दूध देऊन मातृत्वाचं अनोखं उदाहरण दिलं

संबंधित बातम्या :

कोरोनाबाधित आईच्या बाळावर प्रेमाची सावली, शेजारी महिलेकडून चिमुकलीचा सांभाळ

प्रसुतीनंतर आईचा अखेरचा श्वास, बाळंतीणींनी Breast Milk पाठवून बाळाच्या आयुष्याची दोर घट्ट केली

(Satara Karad Hospital manages Babies of 225 Corona Positive Mothers in Pandemic)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.