सातारा : गेल्या काही दिवसांपासून जंगलातील प्राणी रस्त्यावर येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच महाबळेश्वरमध्ये एक टन वजनाचा जंगली गवा विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. (Satara Mahabaleshwar Wild Bison Falls In Well)
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.30 च्या सुमारास साताऱ्यातील महाबळेश्वर या परिसरात असणऱ्या एका विहिरीत जंगली गवा कोसळला. या गव्याचे वजन तब्बल एक टन असल्याचे बोललं जात आहे. या घटनेनंतर वनविभाग आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या जंगली गव्याच्या तोंडात पाण्याच्या मोटारीच्या दोऱ्या अडकल्या आहेत. त्याचे वजन जास्त असल्याने त्याला क्रेनच्या मदतीशिवाय बाहेर काढणे अशक्य आहे. दरम्यान हा गवा विहिरीत नेमका कसा पडला, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान बुधवारी (9 डिसेंबर) सकाळी आठच्या सुमारास जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. यातच रानगव्याचा मृत्यू झाला.
सातशे ते आठशे किलो वजन
हा गवा अत्यंत शक्तिशाली होता. तब्बल 700 ते 800 किलो वजनाचा हा गवा होता. जंगलात राहणारा हा महाकाय प्राणी बुधवारी पुण्यात आल्याने नागरिकांची या गव्याला पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. (Satara Mahabaleshwar Wild Bison Falls In Well)
संबंधित बातम्या :