एसटी कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा चव्हाट्यावर, सुदैवाने दुर्घटना टळली, नाहीतर…

सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचारी बेफिकीर असल्याचं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. विद्यार्थी खिडकीतून आतमध्ये घुसत असताना बस सुरु झाली. हा प्रकार पाहणाऱ्या सगळ्या प्रवाशांना घाम फुटला असल्याची माहिती मिळाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा चव्हाट्यावर, सुदैवाने दुर्घटना टळली, नाहीतर...
MSRTC News In MarathiImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 8:34 AM

सातारा : ग्रामीण भागात एसटीच्या (Satara ST News) कर्मचाऱ्यांचा मनमर्जीपणा, बेफिकीरपणा, त्याचबरोबर लोकांची उद्धटपणे वागणे असं पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यांचे व्हिडीओ (ST Video) सुध्दा अधिक व्हायरल झाले आहेत. राज्य सरकारकड़ून (MSRTC News In Marathi) एसटीच्या जुन्या गाड्या बदलाव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी करीत आहेत. परंतु एसटीच्या बस काही बदलत नाहीत. काल सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्याचा पुन्हा एका आडमुठेपणा उजेडात आला आहे. विशेष म्हणजे ती एसटी तिथं असलेल्या विद्यार्थ्यांनी थांबवली, नाहीतर मोठा अपघात झाला असता अशी तिथल्या प्रवाशांमध्ये चर्चा आहे.

विद्यार्थीनी एसटीत खिडकीतून घुसली

सातारा नागठाणे येथे सातारा ते मुरुड जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिला प्रवासी व महिला वाहकांमध्ये वाद झाला. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागठाणे येथे बस थांब्यावर एसटी बस थांबली. त्यावेळी हा वाद सुरू होता. त्याचवेळी एसटीच्या प्रतिक्षेत अनेक विद्यार्थी रस्त्याच्याकडेला उभे होते. मात्र सुमारे पंधरा मिनिटे झाल्यानंतर सुध्दा एसटीचा दरवाजा आतून उघडला गेला नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

हे सुद्धा वाचा

एसटीच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

या दरम्यानच एका विद्यार्थिनीने चक्क खिडकीतून एसटीमध्ये प्रवेश केला. हे थरारक चित्र पाहून एसटीच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी खिडकीतून आतमध्ये घुसत असताना एसटी पुढे जात होती, त्यावेळी विद्यार्थ्यांनी ती बस थांबवली. त्यावेळी हा प्रकार पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. एसटी थांबल्यानंतर पुन्हा एसटी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. काल एसटीच्या कर्मचाऱ्याने डोक्यावर छत्री पकडून गाडी चालवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...