केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंची कार्यतत्परता; साताऱ्याच्या 50 प्रशिक्षणार्थींची केली तात्काळ मदत

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंगसाठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्समधून 50 जण या ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते. चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत असताना त्यांचा अपघात झाला होता.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंची कार्यतत्परता; साताऱ्याच्या 50 प्रशिक्षणार्थींची केली तात्काळ मदत
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 6:48 PM

मुंबईः साताऱ्याचे 50 प्रशिक्षणार्थी (Trainee) मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. मनालीहून प्रशिक्षणाहून परत येतांना त्यांच्या बसला अपघात झाला. दिल्लीवरुन निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही चुकली होती. त्यानंतर केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे (Union Minister of State for Railways, Coal and Mines Raosaheb Patil-Danve) यांनी त्यांची तात्काळ व्यवस्था करुन त्या सर्व प्रशिक्षणार्थींना साताऱ्याला पोहचवले. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यतत्परता दाखवून दिली.

मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील 50 प्रशिक्षणार्थी असलेल्या बसचा अपघात झाला होता. प्रशिक्षण संपून माघारी येत असताना मंडी परिसरात हा अपघात झाला.

प्रशिक्षणासाठी 50 जण

यावेळी एकूण 50 जण प्रशिक्षणासाठी साताऱ्यातून रेस्क्यू ऑपरेशनच्या ट्रेनिंगसाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते. प्रशिक्षण संपवून परत येताना मनाली येथील मंडी परिसरात त्यांच्या बसला अपघात झाला.

मनालीमध्ये बसचा अपघात

सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंगसाठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्समधून 50 जण या ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते. चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत असताना दुसऱ्या बसने साताऱ्याच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या बसला समोरून धडक दिली होती. या अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे तर इतर पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

रावसाहेब दानवे यांची मदत

अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तर सर्व ट्रेकर्स टीममधील सदस्य हे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या तत्परतेमुळे दिल्लीवरुन निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसने सातार्‍याच्या दिशेने रवाना झाले. रावसाहेब दानवे यांच्या या तत्परतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यानंतर हे सर्व साताऱ्याला घरी पोहचेपर्यंत श्री दानवे त्यांच्या संपर्कात होते व त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.

शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.