“शरद पवार हे वैचारिक व्हायरस”; गुणरत्न सदावर्ते यांनी पवारांवर तोफ डागली…

कष्टकरी जनसंघात सर्वात जास्त उमेदवार मराठा समाजाचे आहेत मात्र शरद पवारांच्या संघटना या सावकारी आहेत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. 

शरद पवार हे वैचारिक व्हायरस; गुणरत्न सदावर्ते यांनी पवारांवर तोफ डागली...
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 7:37 PM

सातारा : काही महिन्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते, त्या आंदोलनावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यावेळी त्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर त्याच वेळी त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यावरून राज्यात जोरदार वादंग माजला होता. तर आजही गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनेल कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर अनेक सवाल उपस्थित केले असून सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर शरद पवार हे कधी कष्टकऱ्यांच्या घरी गेलेत का, असा सवाल उपस्थित करून पवारांच्यामुळे राज्यातील 124 एसटी कर्मचारी गतप्राण झाले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

गौतमी पाटीलवर तोंडसुख

गुणरत्न सदावर्ते यांनी ज्या प्रमाणे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे, त्याच प्रमाणे त्यांनी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी गौतमी पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले होते असा जोरदार टोलाही त्यांनी पवार कुटुंबीयांना हाणला आहे.

कष्टकऱ्यांच्या घरी गेले नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे जसे कष्टकऱ्यांच्या घरी गेले नाहीत, त्याच प्रमाणे त्यांनी कधी सर्वसामान्यांनाही कधी समजून घेतले नाही. त्यामुळे आताच्या काळात शरद पवार म्हणजे हे वैचारिक व्हायरस असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. यावेळी पवारांना सूचक इशारा देत त्यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात आमचे कष्टकरी कुणालाही घाबरून काम करत नाही असा त्यांनी कर्मचाऱ्यांविषयी विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पवारांना धडा शिकवण्याची वेळ

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी औरंगाबाद शहराचे नामाकरण झाल्यानंतर दौरा केला होता, त्यावेळी शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर असं न उच्चारता त्यांनी औरंगाबाद असाच उल्लेख केला होता. त्यावरूनही गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, इतरांसाठी औरगाबाद असेल मात्र आमच्यासाठी ते छत्रपती संभाजी नगरच असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे आता शरद पवार यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असा इशारा त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमातून त्यांनी इशारा दिला आहे.

त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचा लढा फक्त साताऱ्यात नाही तर महाराष्ट्रात लढा उभा करु असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जनसंघात मराठा समाजाचे उमेदवार

यावेळी ते म्हणाले की, कष्टकरी जनसंघात सर्वात जास्त उमेदवार मराठा समाजाचे आहेत मात्र शरद पवारांच्या संघटना या सावकारी आहेत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी साताऱ्याची आठवण सांगताना साताऱ्यात काही दिवस जेलमध्ये होतो अशी आठवणही त्यांनी करून दिली.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.