Ajit Pawar : काही लोक छत्रीसारखे उगवतात, पोपटासारखे बोलणाऱ्यांनी कारखाना चालवून दाखवावा, अजित पवारांचा पु्न्हा राज ठाकरेंना टोला

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चाललाय. किसनवीर कारखान्यात 52 हजार सभासद आहेत. याबाबत लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेणार आहे, असे बोलताना, जे पोपटा सारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा, असा टोला अजित पवारांनी लगावला.

Ajit Pawar : काही लोक छत्रीसारखे उगवतात, पोपटासारखे बोलणाऱ्यांनी कारखाना चालवून दाखवावा, अजित पवारांचा पु्न्हा राज ठाकरेंना टोला
काही लोक छत्रीसारखे उगवतात, पोपटासारखे बोलणाऱ्यांनी कारखाना चालवून दाखवावा, अजित पवारांचा पु्न्हा राज ठाकरेंना टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 8:45 PM

सातारा : राज्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने आले आहे. पवारांवर (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीवर राज ठाकरे सतत जतीय राजकारण वाढल्याचा आरोप करत आहेत. तर या आरोपांना अजित पवार (Ajit Pawar) यांनीही तसेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.या जिल्यात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करणार आहे. प्रत्येक गावाचं सहकार्य असल्या शिवाय कोणतेही विकास होऊ शकत नाहीत. स्वच्छते बाबत सातारा जिल्हा कायम पहिला राहिला. राज्याला दिशा देण्याचे काम साताऱ्याने केले. राज्यात ऊसाची खुप परिस्थिती वाईट आहे. साखर कारखाना चालवण्याचे वेड्या गबाळ्याचे काम नाही. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चाललाय. किसनवीर कारखान्यात 52 हजार सभासद आहेत. याबाबत लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेणार आहे, असे बोलताना, जे पोपटा सारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा, असा टोला अजित पवारांनी लगावला.

काही लोक छत्रीसारखे उगवतात

तसेच मकरंद आबांनी किसनवीर कारखान्याकडे लक्ष घातले नाही तर आमदारकी धोक्यात येईल, असेही ते म्हणाले. साखर कारखान्यामध्ये चुकीचे बोर्ड निवडून आले तर नागरिकांच्या प्रपंचाला फटका बसतो. राज्यात काही लोक जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत त्याला सातारकरांनी बळी पडू नका. असा टोलाही त्यांनी लगावला, तसेच लोक पावसाळ्याच्या छत्री प्रमाणे उगवतात. कधी टोल बंद करा म्हणतात. तर कधी युपी बिहारच्या लोकांना हाकलून द्या, भोंगे बंद करा असे म्हणतात. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला दिसला नाही का? यांना परंतु यांच्या या निर्णयामुळे तुम्ही कोणाला तरी अडचणीत आण्याचा प्रयत्न करताय. परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे. समंजस भूमिका घेवून मार्ग काढू शकतो, असेही ते म्हणाले.

राणा आणि पडळकरांनाही टोला

तसेच हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांच्या घरा समोर जावून बोलायचीये. परंतु तुम्हाला म्हणायचीये तर घरी जावून म्हणा, असा टोलाही त्यानी राणा यांना लगावाल आहे. तसेच महाराष्ट्राचं वातावरण जर बिघडलं तर कोणताही उद्योगपती महाराष्ट्रात येणार नाही. पेट्रोल डिझेलचे भाव त्यावर कोण बोलत नाही. बारामतीला एक जण उभा राहिला होता. पण बारामतीने योग्य जागा दाखवली. असे म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे. राज्यात कोणीही वातावरण खराब करु नये. सातारा जिल्हयात पर्यटनासाठी 50 कोटींचा खर्च करुन तापोळा बामणोलीचे रुपडं पालटणार आहे. महाबळेश्वर मध्ये विकास कामांसाठी 100 कोटीची तरतूद करणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.