Satara : शहीद जवान विपुल इंगवले यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
विपुल इंगवले यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून त्यांच्या तब्येतीत चढउतार होत होतं. तसेच मागील एक वर्षापासून ते उपचारांना साथ देत नव्हते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं रूग्णालयाने स्पष्ट केलं.
सातारा – शहीद जवान विपुल इंगवलेंना (Vipul Ingwale) त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या भागातील नागरिक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेकांनी जवानाच्या कुटुंबियांना आधार देण्याचं काम केलं. शहीद झाल्याची बातमी समजल्यापासून इंगोले कुटुंबियावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. सातारा (Satara) जिल्ह्यातील भोसे (Bhose) विपुल इंगवले यांचं गाव आहे. कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे विपुल दिलीप इंगवले यांना आले वीरमरण आहे. सियाचीन येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत बजावत असताना शहीद विपुल इंगवले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी केले होते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये मागील एक वर्षापासून सुरू होते उपचार होते. उपचारादरम्यान कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावरती मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमांड रूग्णालयात सुरू होते उपचार
विपुल इंगवले यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून त्यांच्या तब्येतीत चढउतार होत होतं. तसेच मागील एक वर्षापासून ते उपचारांना साथ देत नव्हते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं रूग्णालयाने स्पष्ट केलं. सियाचीन येथे ड्युटीवर असताना त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला होता. त्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती उपचार सुरु केले. हे उपचार दीर्घ चालणार हे माहित झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
घरची परिस्थिती बेताची असताना सैन्यात भरती झाले
ग्रामीण भागात असताना सैन्यात भरती व्हायचं असं लहानपणापासून स्वप्न पाहणाऱ्या विपुल दिलीप इंगवले यांनी तसे प्रयत्न केले. घरची परिस्थिती बेताची असता सुद्धा केलेल्या प्रयत्नाला त्यांच्या यश आलं. सैन्यात भरती झाल्यानंतर घरची मंडळी देखील खूश होती. त्याचबरोबर पंचक्रोशीत देखील नाव झालं होतं.
सियाचीन येथे तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या गावात शोककळा पसरली आहे.